राष्ट्रीय साथरोग नियत्रंण कार्यक्रम

राष्ट्रीय साथरोग नियंत्रण कार्यक्रम

साथीचे आजार होऊ नयेत म्हणून पूर्व नियोजन महत्वाचे आहे. जिल्हास्तरीय साथरोग शीघ्र प्रतिसाद पथकामध्ये १) अति.जि.आ.अ. २) साथरोग वै.अ. ३) प्रमुख रसायनशास्त्रज्ञ ४) बालरोग तज्ञ ५) फिजिशियन व ६) जिल्हा हिवताप अधिकारी यांचा समावेश आहे.जिल्हास्तरीय आपत्कालीन वैद्यकीय मदत पथकामध्ये दोन वै.अ. आणि दहा कर्मचारी यांचा समावेश आहे.तसेच जिल्हास्तरावर माहे जून ते ऑक्टोबर या जोखमीच्या कालावधीत २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येते.

संपर्क तुटलेल्या गावांसाठी विशेष उपाययोजना, स्थलांतरित कॅम्प्मध्ये वैद्यकीय सुविधा, क्षेत्रीय प्रयोगशाळांची स्थापना, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग, पुरेसा औषधसाठा, अतिरिक्त औषधसाठा, आरोग्य शिक्षण, परिसर स्वच्छता,इ. बाबत नियोजन करण्यात येते.

जिल्हास्तरावर, प्रा.आ.केंद्र स्तरावर वउपकेंद्र स्तरावर पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे टी.सी.एल. पावडर वापरून शुद्धीकरण करणे बाबतची कार्यवाही आरोग्य विभागाच्या देखरेखी खाली करण्यात येत आहे.जेथे सार्वजनिक पाणीपुरवठा स्त्रोत बंद आहे अशा ठिकाणी मेडीक्लोर द्रावण / क्लोरीन टॅबलेटयांचा वापर  शुद्धीकरणासाठी करण्यात येत आहे.

स्थानिक वर्तमानपत्रातून जनतेला खालीलप्रमाणे आवाहन करण्यात आलेले आहे.

  1. पाणी उकळून गार करून पिण्यासाठी वापरावे.
  2. शुद्धीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे.
  3. शुद्धीकरणासाठी आवश्यक मेडीक्लोर / क्लोरीनच्या गोळ्या नजीकच्या प्रा.आ.केंद्रात /आरोग्य कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध आहेत.
  4. जलजन्य आजाराच्या रुग्णांनी त्वरित जवळच्या प्रा.आ.केंद्राशी./ आरोग्य कार्चार्याशी संपर्क साधावा.

जलजन्य साथीचे उद्रेक्ग्रस्त गावे १५ वर्षातील तुलनात्मक स्थिती

 

वर्ष

उद्रेक्ग्रस्त गावांची संख्या

2000 - 2005

55

2006 - 2010

19

2011 - 2016

10

 

जलजन्य साथीचे उद्रेकात झालेले मृत्यू तुलनात्मक माहिती मागील पाच वर्षात सन २०११ ते २०१६

वर्ष

जलजन्य उद्रेकात झालेले मृत्यू

२०००- २००५

१३

२००६- २०१०

१०

२०११- २०१६

०२

 

निष्कर्ष – आलेख क्र. १ व २ नुसार मागील १५ वर्षात जलजन्य साथीचे उद्रेक्ग्रस्त गावे उल्लेखनीयरित्या कमी होताना दिसतात याची प्रमुख कारणे १) ग्रामपंचायत मार्फत निर्जन्तुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडरच्या वापरातील सातत्य २) लोकांमध्ये निर्जन्तुकीकरण केलेलेच पाणी प्यावे या बाबत झालेली मोठ्या प्रमाणात जनजागृती.       ३) ग्रामीण भागात शौचालयाच्या वापरात झालेली वाढ.

किटकजन्य साथीचे उद्रेक तालुका निहाय तुलनात्मक माहितीचा तक्ता

अ.क्र

तालुक्याचे नाव

कीटकजन्य साथग्रस्थ गावे (मागील पाच वर्षातील)

बीड

११

गेवराई

१२

माजलगाव

धारूर

वडवणी

१३

केज

परळी

अंबाजोगाई

पाटोदा

११

१०

शिरूर

११

आष्टी

२०

 

निष्कर्ष –

१) आष्टी तालुक्यात सर्वात जास्त कीटकजन्य साथीचे उद्रेक उदभवले याची प्रमुख कारणे लोकं वस्त्यावर राहतात, शेतातील वस्त्यावरील घरात पुरेशा प्रमाणात खिडक्या नसल्यामुळे घरात कायम अंधार राहतो.घरातच रांजण तिरक्या स्थितीत वीट बांधकामात पक्के केल्यामुळे त्याच्यावर झाकाण ठेवता येत नाहो व व्यवस्थित धुता येत नाहीत.त्यामुळे डास निर्मितीला पोषक वातावरण आहे.

२) वडवणी,गेवराई , बीड, माजलगाव, तालुक्यात घरामध्ये उघड्या सिमेंट च्या टाक्या व मोठ्या प्रमाणात रांजण असल्यामुळे डास निर्मितीला पोषक वातावरण आहे.तसेच या तालुक्यात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात असून कुटुंबातील सर्व सदस्य कापूस मशागत व वेचणी कामात सकाळपासून सायंकाळ पर्यंत शेतात कामास जातात त्यामुळे घरातील सिमेंट च्या टाक्या, रांजण, स्वच्छ करणे साफसफाई कामाकडे दुर्लक्ष दिसून येते.

३) पाटोदा तालुक्यात ऊसतोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित होतात त्यामुळे घरातील उघडे माठ, रांजण, हौद, यामध्ये डासांची निर्मिती होते त्याची साफसफाई करण्यासाठी कोणी घरात नसतात व पूर्वी तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई असल्यामुळे पाण्याची साठवण केली जात होती.

  • मौजे.नेकनूर येथील साथ उद्रेकास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ,संदीप सांगळे व जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाची भेट

  • मौजे चीचखंडी येथील अन्नाविशबाधा उद्रेकास जिल्हा शीघ्र प्रतिसाद पथकाची भेट.

  • आकाशवाणी बीड येथून ग्रामीण भागातील जनतेशी साथ रोगाबाबत घ्यावयाची काळजी या विषयी थेट संवाद.



Diseasewise Outbreaks During Year 2009 to 2016

Sr No

Name Of Disease

Total Outbreaks 

2009

2010

2011

2012

2013

2014

2015

2016

1

Dengue

5

2

3

8

10

4

3

4

2

Chikungunya

3

6

15

5

4

3

0

1

3

Dengue & Chikungunya

0

0

0

1

3

14

0

1

4

Gastro

2

9

0

1

0

2

0

1

5

Hepatitis

0

0

1

0

1

1

0

0

6

Diarrhoea

0

0

0

0

0

0

2

0

7

Fever

0

7

3

9

3

5

2

0

8

Malaria

0

3

0

0

0

0

0

0

9

Typhoid

0

0

0

0

0

0

0

1

 

Total

10

27

22

24

21

29

7

8