ग्रामिण पाणी पुरवठा विभाग
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे केले आहे.
पाणी पुरवठा योजनेंतर्गत खालील पाणी पुरवठ्याच्या योजना हाती घेता येतील.
साधी विहीर
अस्तीत्वातील विहीरींचे रुंदीकरण व खोलीकरण
विंधन विहीर (हातपंप)
लघु नळ पाणी पुरवठा योजना
शिवकालीन पाणी साठवण योजना
अस्तीत्वातील योजनेची दुरुस्ती
अस्तीत्वातील योजनेतील उद्भवाचे बळकटीकरण
योजना विस्तारीकरण
पुरक योजना
नविन योजना
वरिलपैकी कोणतीही योजना आपल्या गावासाठी राबवावयाची झाल्यास आपल्या तालुक्यातील उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा.
पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी, त्याचे नियोजन व कार्यवाही तसेच विहित कालावधी खालीलप्रमाणे आहे.