जिल्हा परिषद स्वनिधी योजना

 

जिल्हा परिषद स्वनिधी योजना

योजनेचे स्वरुप :- या योजनेअंतर्गत ग्रामिण कार्यक्षेत्रातील लाभार्थीना खालील प्रमाणे आर्थीक मदत मिळते.
अ) र्‍हदय शस्त्रक्रिया करिता :- र.रु.१०,०००/-
ब) कॅन्सर उपचार करिता :- र.रु.१०,०००/-
क) किडणी रोपन करिता :- र.रु.१०,०००/-
सदर योजनेचा लाभ देण्याकरिता जि. प. स्तरावर खालील प्रमाणे र्‍हदयरोग, कॅन्सर, किडणी करिता आर्थिक मदत समिती,जि.प.बीड ही समिती गठीत केलेली आहे.

·         मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, बीड - अध्यक्ष

·         मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड. - सदस्य

·         मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. बीड. - सदस्य

·         मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. बीड - सदस्य सचिव

लाभार्थी कोण :- र्‍हदयरोग,कॅन्सर किंवा किडणी या रोगांनी पिडीत असलेली व्यक्ति.
निकष व अटी :-

·         रुग्ण बीड जिल्हयातील ग्रामिण कार्यक्षेत्रातील असावा.

·         रुग्णांने शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयात उपचार /शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल.

·         ज्यांना वैद्यकिय परिपूर्ती मिळते अश्या कर्मचारी रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

·         अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :- मा.जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.बीड यांचे नांवे लाभार्थीचा अर्ज

·         शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयाचे

·         रोगनिदानासह, खर्चाचे अंदाजपत्रक.

·         रहिवाशी दाखला. (तलाठी यांचेकडील)

·         रेशनकार्ड पहिल्या व शेवटच्या पानांची प्रमाणित केलेली छायांकित प्रत.

·         उत्पन्नाचे प्रमाणपत्र.(तहसीलदार यांचेकडील)

लाभार्थ्यास आर्थिक लाभ देण्यात आलेली वर्ष निहाय माहिती

वर्ष

एकूण प्रकरणे

मान्य प्रकरणे

एकूण रक्कम

२०१२-१३

२९३

२३७

२३७००००/-

२०१३-१४

२९५

२३०

२३०००००/-

२०१४-१५

१५२

१०९

१०९००००/-

२०१५-१६

९४

४४

४४००००/-

२०१६-१७

६१

३१

३१००००/-

संबंधीत संपर्क अधिकारी :- 
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,बीड.
दूरध्वनी क्रमांक – ०२४४२-२३०१८५.

 

शासन निर्णय क्र. साफुयो/२००४/१५११/प्रक्र २९७/कुक३ दिनांक २४/४/२००७ नविन योजनेनुसार (दि.१ एप्रिल २००७ पासून) एक मुलीवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व मुलींचे नावे रु.आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत व दोन मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन घेणार्‍या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु.चार हजार या प्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत देण्यांत येते.या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

·         या योजनेचा लाभ देणेकरिता कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुन घेणारी व्यक्ती ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबांतील असणे आवश्यक आहे.

·         सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यांतील आधिवासी असणार्‍या कुटूंबानाच देय आहे.

·         सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीने (पती अथवा पत्नी)शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक यांचे रुग्णालयांत केलेली असावी.

·         सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीस (पती अथवा पत्नी) एक किंवा दोन मुलीच असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा.