राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम (शासकिय योजना)

 

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम (शासकिय योजना)

वेगाने वाढणार्‍या लोकसंख्या नियंत्रण ठेवणेकरिता राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आपल्या देशात १९५२ पासून राबविणेत येत आहे.या कार्यक्रम अंतर्गत दोन मुलांमध्ये अंतर ठेवणे करिता पाळणा लांबविण्याच्या तात्पुरत्या पध्दती उदा-तांबी,गर्भनिरोधक गोळया,निरोध,तांतडीच्या गोळया, (इमर्जन्सी पिल्स) इ साधने उपलब्ध असून पाळणा थांबविणेसाठी टाका व बिनटाका या स्त्रीशस्त्रक्रिया व बिनटाका व पारंपारिक पध्दतीच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

जिल्हयात नसबंदी शस्त्रक्रियागृह असलेलया प्रा आ केंद्राच्या ठिकाणी दरमहा टाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे व निश्‍चित केलेल्या प्रा आ केंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे ठिकाणी बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करुन आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत योग्य लाभार्थीना प्रवृत्त केले जाते व त्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जातात.शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना प्रोत्साहनपर मोबदला दिला जातेा.

कमी वयात लग्न,मुलगाच हवा हा अटटाहास, दोन मुलांमधील कमी अंतर, इ.बाबींवर खास आरोग्य शिक्षणाद्वारे जनजागृती केली जाते.

अ) राज्य लोकसंख्या धोरण राबविणे:-
जन्मदर कमी करणेसाठी कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अम्मलबजावणी गुणवत्तापूर्ण करणेची आवश्यकता आहे.यामध्ये १ किंवा २ अपत्या वर नसबंदी शस्त्रक्रिया जास्तीत जास्त करणे, पुरुष नसबंदीचा स्वीकार करणे, २ अपत्यांमध्ये पुरेसे अंतर ठेवणेसाठी संतती प्रतिबंधक साधनांचा गुणवत्तापूर्वक वापर करणे.