सा. प्र.वि. तपासणी
मा. विभागीय आयुक्त , पुणे विभाग याचे मार्फत जिल्हा परिषदेची वार्षिक तपासणी करणेत येते. तसेच पंयायत समितीची तपासणी दर 5 वर्षातून एकवेळ केली जाते. ज्या तालुक्यांची तपासणी मा. विभागीय आयुक्त यांचे मार्फत होत नाही. अशा पंचायत समित्यांची तपासणी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांचे मार्फत केली जाते. त्यामध्ये आस्थापना विषयक बाबींचे कामकाज विहीत कालावधीत किंवा नमुन्यात होत आहे किंवा नाही हे पाहून त्यांना कामकाजामध्ये असणा-या त्रुटीची पूर्तता करुन घेतली जाते. जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत येत असलेल्या या विविध योजना व विकास कामे योग्य रितीने राबविण्यात येतात किंवा नाही याबाबतची तपासणी करुन कामात सुधारणा होणेचे दृष्टीकोनातून त्रुटी निदर्शनास आणून मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेकडील विविध विभागाची वार्षिक तपासणी करणेत येते. सामान्य प्रशासन विभागामार्फत तपासणीचे नियोजन व अंमलबजावणी केली जाते. जिल्हा परिषदेकडील विविध विभागांची तपास्ाणी व तालुकास्तरावरील कार्यालयांची तपासणी पथकामार्फत केली जाते.