विहान प्रकल्प

जिल्हा परिषद, बीड मार्फत विहान प्रकल्प- बीड यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील HIV संसर्गित नागरिकासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

  •  जिल्ह्यात निवासस्थान व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. 
  •  संजय गांधी निराधार योजनेसाठी प्रस्ताव स्वीकारून मंजूरीसाठी  कार्यवाही करण्यात  येत आहे. 
  • पात्र कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील पिवळी शिधापत्रिका मिळणेसाठी प्रस्ताव स्वीकारून मंजूरीसाठी  कार्यवाही करण्यात  येत आहे. 
  • जिल्हा परिषद बीड मार्फत HIV संसर्गित जोडप्याच्या समूहिक विवाह सोहळ्यासाठी वेळोवेळी भरीव योगदान देण्यात येत आहे.
  • जिल्हा परिषद बीड मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रम व योजनेत HIV संसर्गित  समुदायास सामावून घेण्याचा प्रयत्न केले जात आहे. 
  • कोरोना काळातील अनाथ बालकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
  • HIV संसर्गित समुदायाचे जीवनमान उंचवणेसाठी व त्यांना सामान्य जनतेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
  • अटल कामगार योजना , रमाई तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याचे काम चालू आहे. 

विहान प्रकल्प-बीड 

उद्दीष्ट- 

विहान प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट HIV संसर्गित समुदायाचे जीवनमान उंचावणे व त्यांना सामान्य जनतेच्या प्रवाहात आणणे हा आहे.

उद्देश-

 • PLHIV (Peoples Living With HIV) चे जीवनमान अधिकाधिक आनंदी, निरोगी, दीर्घ आयुष्यी आणि पूर्णपणे आरामदायी बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे.
• PLHIV (Peoples Living With HIV)  ला मानसिक, शारीरिक, सामाजिक तसेच वैद्यकीय मदत करणे.
• PLHIV (Peoples Living With HIV) नी त्यांचे औषधोपचार घेण्याकरिता त्यांचा वेळेवर पाठपुरावा करणे.
• PLHIV (Peoples Living With HIV) ला स्वाभिमानी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे.
• वैद्यकीय सुविधा मिळू शकतील आशी केंद्र प्रस्थापित करून त्यातून सेवा देणे.
ध्येय-
HIV संसर्गित समुदयाची जगण्याची आणि जीवनाची गुणवत्ता सुधारणे.
नोंदणी- 

विहान प्रकल्प अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये दोन युनिट कार्यरत आहेत.

 

Øबीड विहान
 
Øअंबाजोगाई विहान         
                                               

युनिट

एकूण नोंदणी

एकूण मृत्यू

सध्या उपचार घेत असलेले

बीड

5597

1162

3473

अंबाजोगाई

12155

2641

3144





विहान प्रकल्प सेवा व सुविधा-
• सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशन
• आधार गट बैठक
• सरकारी योजना विषयी मार्गदर्शन व सहकार्य
• संदर्भीय सेवा
• प्रबोधनात्मक कार्यक्रम
• कलंक भेदभाव कमी करण्यासाठी
• कायदेविषयी सल्ला व मार्गदर्शन
• गृहभेट
• HIV तपासणी ( जोडीदाराची तपासणी )
• T.B. तपासणी
 

विहान प्रकल्पातून राबवले जाणारे उपक्रम-

  •     वधु वर परिचय मेळाव्यांतर्गत सामुहिक विवाह सोहळा
  •     जुळून येती  रेशीम गाठी  सर्वधर्मीय सामुहिक विवाह  सोहळा
  •      महिला दिनानिमित्य PAP Smear तपासणी
  •      शालेय साहित्य वाटप
  •     पौष्टिक आहार वाटप
  •     विधवा महिला/युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण
  •     ईद निमित्य शिरखुर्मा साहित्य व साड्या वाटप