विहान प्रकल्प
जिल्हा परिषद, बीड मार्फत विहान प्रकल्प- बीड यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील HIV संसर्गित नागरिकासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
- जिल्ह्यात निवासस्थान व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे.
- संजय गांधी निराधार योजनेसाठी प्रस्ताव स्वीकारून मंजूरीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
- पात्र कुटुंबाचे दारिद्रय रेषेखालील पिवळी शिधापत्रिका मिळणेसाठी प्रस्ताव स्वीकारून मंजूरीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.
- जिल्हा परिषद बीड मार्फत HIV संसर्गित जोडप्याच्या समूहिक विवाह सोहळ्यासाठी वेळोवेळी भरीव योगदान देण्यात येत आहे.
- जिल्हा परिषद बीड मार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रम व योजनेत HIV संसर्गित समुदायास सामावून घेण्याचा प्रयत्न केले जात आहे.
- कोरोना काळातील अनाथ बालकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
- HIV संसर्गित समुदायाचे जीवनमान उंचवणेसाठी व त्यांना सामान्य जनतेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
- अटल कामगार योजना , रमाई तसेच प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याचे काम चालू आहे.
विहान प्रकल्प-बीड
उद्दीष्ट-
विहान प्रकल्पाचे मुख्य उदिष्ट HIV संसर्गित समुदायाचे जीवनमान उंचावणे व त्यांना सामान्य जनतेच्या प्रवाहात आणणे हा आहे.
उद्देश-
• PLHIV (Peoples Living With HIV) चे जीवनमान अधिकाधिक आनंदी, निरोगी, दीर्घ आयुष्यी आणि पूर्णपणे आरामदायी बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे.
• PLHIV (Peoples Living With HIV) ला मानसिक, शारीरिक, सामाजिक तसेच वैद्यकीय मदत करणे.
• PLHIV (Peoples Living With HIV) नी त्यांचे औषधोपचार घेण्याकरिता त्यांचा वेळेवर पाठपुरावा करणे.
• PLHIV (Peoples Living With HIV) ला स्वाभिमानी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे.
• वैद्यकीय सुविधा मिळू शकतील आशी केंद्र प्रस्थापित करून त्यातून सेवा देणे.
ध्येय-
HIV संसर्गित समुदयाची जगण्याची आणि जीवनाची गुणवत्ता सुधारणे.
नोंदणी-
विहान प्रकल्प अंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये दोन युनिट कार्यरत आहेत.
Øबीड विहान
Øअंबाजोगाई विहान
युनिट |
एकूण नोंदणी |
एकूण मृत्यू |
सध्या उपचार घेत असलेले |
बीड |
5597 |
1162 |
3473 |
अंबाजोगाई |
12155 |
2641 |
3144 |
विहान प्रकल्प सेवा व सुविधा-
• सल्ला, मार्गदर्शन व समुपदेशन
• आधार गट बैठक
• सरकारी योजना विषयी मार्गदर्शन व सहकार्य
• संदर्भीय सेवा
• प्रबोधनात्मक कार्यक्रम
• कलंक भेदभाव कमी करण्यासाठी
• कायदेविषयी सल्ला व मार्गदर्शन
• गृहभेट
• HIV तपासणी ( जोडीदाराची तपासणी )
• T.B. तपासणी
विहान प्रकल्पातून राबवले जाणारे उपक्रम-
- वधु वर परिचय मेळाव्यांतर्गत सामुहिक विवाह सोहळा
- जुळून येती रेशीम गाठी सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा
- महिला दिनानिमित्य PAP Smear तपासणी
- शालेय साहित्य वाटप
- पौष्टिक आहार वाटप
- विधवा महिला/युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण
- ईद निमित्य शिरखुर्मा साहित्य व साड्या वाटप