जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

ग्रामीण दारिद्र्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) सुरू केले आहे. सदर अभियानाची देशभरात इंटेन्सिव्ह व नॉन इंटेन्सिव्ह या दोन प्रकारात अंमलबजावणी केली जाते. तीव्र दारिद्र्याची लक्षणे असलेल्या (Acute Poverty) असलेल्या भागात इंटेन्सिव्ह तर उर्वरित भागात नॉन इंटेन्सिव्ह प्रकारात अंमलबजावणी करण्यात येते. तथापि महाराष्ट्र शासनाने सदर अभियान महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानद्वारे नॉन इंटेन्सिव्ह भागातील प्रत्येक तालुक्यातील द्रारिद्र्याचे प्रमाण व अ.जा./जमातींचे प्रमाण जास्त असलेल्या एक जि.प. गटात सेमी इंटेन्सिव्ह कार्यपध्दतीद्वारे अंमलबजावणी केली जाते.
सातारा जिल्ह्यामध्ये नॉन इंटेन्सिव्ह कार्यपध्दतीद्वारे सदर अभियानाची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये आकरा तालुक्यातील द्रारिद्र्याचे प्रमाण व अ.जा./जमातींचे प्रमाण जास्त असलेल्या एका जि.प. गटात सेमी इंटेन्सिव्ह कार्यपध्दतीद्वारे तर उर्वरित भागात नॉन इंटेन्सिव्ह पध्दतीद्वारे अंमलबजावणी केली जात आहे. सेमी इंटेन्सिव्ह कार्यक्षेत्रातील अंमलबजावणी राज्यस्तरावरून प्रशिक्षित कंत्राटी तालुका समन्वयक यांचेकडून तर नॉन इंटेन्सिव्ह कार्यक्षेत्रात विस्तार अधिकारी(एनआरएलएम) यांचेमार्फत केली जात आहे.