बंद

    आरोग्य विभाग

    आरोग्य विभाग

    प्रस्तावना

    भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उददीष्ट सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते व साथरोग नियंत्रण उदा.प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने प्राधान्याने कॅन्टोमेंट भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे अस्तित्वात असलेल्या पारंपारिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले. सुरवातील मोठया शहरात हॉस्पिटल व दवाखाने यांच्यामार्फत उपचारात्मक सेवा देणे सुरु केले. नियोजन समितीने 1940 साली ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणेची सूचना केली व 1000 लोकसंख्येला 1 आरोग्य सेवक व प्रमाणात आरोग्य सेवकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र 1942 साली कलकत्याजवळ (पश्चिम बंगाल) शिंगुर या गावी सुरु केले. त्याला ग्रामीण आरोग्य पथक असे संबोधण्यात आले. ग्रामीण आरोग्य सेवा डॉ.जेम्स ग्रॅड, संचालक, अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला आहे.
    त्याच सुमारास मुंबई प्रांत सरकारच्या आर्थिक सहाय्याने आरोग्य सेवा पदध्ती महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. 1977 साली झालेल्या 13 व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश यांनी समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उदिदष्ट ठरविले हेच 2000साली सर्वांना आरोग्य या नावाने प्रसिध्द झाले. या उदिदष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हिच गुरुकिल्ली आहे हे स्विकत स्विकृत करण्यात आले.

    दृष्टी आणि ध्येय

    1. आरोग्य सेवेअंतर्गत होणारा एकुण खर्च जी. डी.पी. च्या सध्याच्या ०.९ टक्के वरून २ ते ३ टक्के पर्यंत वाढविणे.
    2. सार्वजनिक आरोग्य सेवांचे पालकत्व, नियंत्रण व व्यवस्थापन स्थानिक संस्थांकडून व्हावे यासाठी पंचायत प्रतिनिधीचे प्रशिक्षण घेऊन त्यांना पाविषयी अवगत करणे.
    3. प्रत्येक गावामध्ये महिला आरोग्य कार्यकर्ती आशा ची निवड करणे.
    4. ग्राम, आरोग्य, पोषण, स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ग्राम आरोग्य योजना बनवणे.
    5. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील सेवांचा दर्जा सुधारणे. (IPHS Std.) स्थानिक पातळीवर ग्राम आरोग्य नियोजन आराखडा बनविणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
    6. सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये स्थानिक पारंपारिक उपचार पध्दती, आयुष (आर्युर्वेद, रोग, निसर्ग उपचार,युनानी, सिध्द, होमीओपॅथी) यांचा समावेश करणे.
    7. विविध समांतर (व्हर्टीकल) आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांना राष्ट्रीय राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर एकात्मिक रुप देणे.

    मिशनचे ध्येय

    1. सर्व उपकेंद्रांना ए.एन.एम. असावी व सर्व उपकेंद्रे कार्यरत असावी.
    2. २४x७ च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ नर्सेस असाव्यात.
    3. सर्व स्तरावरील रुग्ण कल्याण समित्या कार्यरत झालेल्या असाव्यात.
    4. आयुष औषधोपचार प्रणाली ही शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत मुख्य प्रवाहात असावी.
    5. सर्व आदिवासी भागांमध्ये आशा कार्यरत व्हावी
    6. जननी सुरक्षा योजनेचा लाभ १०० टक्के लाभार्थीना मिळावा.
    7. निवड झालेल्या जिल्हयामध्ये एकात्मिक नवजात अर्भक व बालकांचा आजराचे व्यवस्थापनावर (IMNCI) आधारित आरोग्य सेवा देण्यात याव्यात.

    उद्दिष्टे आणि कार्य

    1. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे.
    2. आरोग्य सेवांची वैधानिक व्यवस्था करणे.
    3. आरोग्य कार्यक्रमांसाठी आर्थिक मंजुरी देणे.
    4. आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांचे आयोजन करणे.
    5. आरोग्य विषयक शिक्षण देणे.
    6. रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण करणे.
    7. पाण्याची गुणवत्ता नियंत्रित करणे.
    8. मुलभूत स्वच्छतेसाठी मार्गदर्शन करणे.
    9. शालेय आणि अंगणवाडीत आरोग्य तपासणी करणे.
    10. प्रयोगशाळेत प्राथमिक तपासणी करणे.

    आरोग्य विभागाचे कार्य:

    1. उपचारात्मक काळजी आणि संदर्भ सेवा देणे.
    2. प्रजनन आणि बाल आरोग्य सेवा देणे.
    3. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे.
    4. जीवन विषयक आकडेवारी एकत्रित करणे आणि अहवाल सादर करणे.
    5. उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी पुरुषांचे पर्यवेक्षण करणे.
    6. आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामकाज पाहणे आणि मार्गदर्शन करणे.
    7. आरोग्य कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या साहित्याचे व्यवस्थापन करणे आणि पुरवठा करणे.
    8. विविध पातळीवर सांघिक कार्य हाती घेणे.
    9. आरोग्य कार्यक्रमाचे अहवाल आणि नोंदी ठेवणे आणि वैद्यकिय अधिकाऱ्यांना सादर करणे.