लघु पाटबंधारे

 

लघुपाटबंधारे विभाग

प्रस्तावना

आपल्या देशामध्ये ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. परंतु सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तसेच जलसंधारणाच्या मोठया प्रकल्पांचा शेतकर्‍यांना फार उशिरा लाभ होत असल्याने सध्या लघु पाटबंधारे कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे. लघु पाटबंधारे स्वरुपाची ० ते १०० हेक्टर्स मधील कामे अल्प कालावधीत पुर्ण होत असलेने त्याचा लाभ त्वरीत शेतकर्‍यांना होत असतो. यामध्ये सामान्यपणे पाझर तलाव, ग्राम तलाव, को.प.बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, साठवण तलाव अशी कामे केली जातात.

अशा ० ते १०० हेक्टर सिचन क्षमतेमधील लघु पाटबंधारेची कामे जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध लेखाशिर्षाअंतर्गत राबविली जातात. यासाठी बीड जिल्हा परिषदेकडे लघु पाटबंधारे विभाग असून त्या अंतर्गत ११ तालुक्यातील लघु पाटबंधारेची कामे लघु पाटबंधारे उपविभाग बीड , पाटोदा , आष्टी , केज, अंबाजोगाई, माजलगाव अशा सहा उपविभागामार्फत केली जातात.

या विभागाकडून करण्यात येणार्‍या विविध कामांची माहिती

पाझर तलाव/ग्राम तलाव

पाणी पाझरण्यासाठी उपयुक्त असलेल्या भुस्तरीय स्थळावर नाला पाहून मातीचा बंधारा बांधून त्यामध्ये पावसाळयात पाणी साठवण्यात येते. अशा प्रकारे साठविलेले पाणी पाझरून तलावाच्या खालील भागातील विहीरीच्या पाण्याची पातळी वाढते. तसेच पाझर तलावाखालील भूजलाची पातळी वाढविणेस या तलावांचा उपयोग होतेा. या तलावापासून होणारे सिचन हे अप्रत्यक्ष स्वरुपाचे सिचन असते. तलावातील उपलब्ध पाण्याच्या उपयोग मत्स्यव्यवसायासाठी ही करता येतो.

कोल्हापुर पध्दतीचे बंधारे

नदी किवा नाले यातून पावसाळयात वाहून जाणारे पाणी दगडी बंाध व झडपाद्धारे (फळया टाकून) अडविले जाते. यास केाल्हापूर पंध्दतीचे बंधारे असे म्हणतात. या मधून उपसा पध्दतीने शेतकरी शेतीला पाणी देऊ शकतो. ज्या ठिकाणी को.प.बंधार्‍याचे वरील बाजूस मोठे धरण/तलाव असतो त्यामधून वरचेवर पाणी सोडून को.प.बंधार्‍यामध्ये पाणी अडवून सिचन केले जाते.

वळण बंधारे

सदरचे बंधारे हे सतत वाहत्या ओढयावर या पध्दतीने बांधण्यात येतात की, वाहणारे पाणी झडपाद्धारेअडवून ठेवण्यात येते व पाटाद्धारे ते पाणी लाभ क्षेत्रातील शेतीस सिचनासाठी वापरण्यात येते. या बंधारेद्धारे प्रत्यक्ष सिचन केले जाते व सदरचे बंधारे हे जेथे पावसाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणीच बांधण्यात येतात.

 

 

 

या विभागाकडील विविध लेखाशिर्षाखालील माहिती

 1. जिल्हा वार्षिक योजना
 2. जलयुक्त शिवार
 3. जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषदस्तरावर मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद बीड यांचे अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती स्थापन केली असून सदर समितीमध्ये मा. उपाध्यक्ष जि.प. बीड, मा. सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प. बीड, मा. सभापती, शेती व पशुसवर्धन, जि.प. बीड व सभापती, महिला व बालकल्याण समिती, व सभापती, समाजकल्याण समिती हे पदसिध्द सदस्य असतात व अन्य आठ जिल्हा परिषद,सदस्य हे सभासद आहेत. त्याच प्रमाणे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड. कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे विभाग जि.प. बीड, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. बीड व उप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग हे देखिल या समितीचे सदस्य आहेत. मा. अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती

 1. अध्यक्ष ( जि. प. अध्यक्ष )
 2. पदसिध्द सदस्य (९ असतील )
 3. सदस्या (६ असतील )
 4. निमंत्रित सदस्य २ असतील ) जल तज्ञ )
 5. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प  बीड  (पदसिध्द सदस्य)
 6. मा. अति मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प बीड ( पदसिध्द सदस्य सचिव )
 7. मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), जि प  बीड (पदसिध्द सदस्य)
 8. मा. कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पूरवठा विभाग, जि प  बीड  (पदसिध्द सदस्य)
 9. मा. जिल्हा जल संधारण अधिकारी , लघु पाटबंधारे विभाग जि प  बीड (पदसिध्द सदस्य)

हायलाईट करावयाच्या बाबी