एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प

 

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प

एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प (IDSP) विकेंद्रीत स्वरुपात राबवायचा देशांतर्गत कार्यक्रम आहे. साथ उदे्रकाच्या आधी धोक्याची सुचना देणारी चिन्हे / लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करणे हा प्रकल्पाचा उददेश आहे. मिळालेल्या माहितीचा उपयोग रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या संनियंत्रणासाठी करुन आरोग्याची साधने, स्त्रोत जास्त परिणामकारकरित्या वापरता यावेत ही पण यामागची भुमिका आहे.

सर्वच साथरोग उदे्रकाची शक्यता, हे त्याचे किती लवकर निदान करता आले व नियंत्रासाठीचे उपाय किती परिणामकारकतेने राबविले गेले यावर अवलंबून आहे. साथ आटोक्यात आणणेच्या सर्व उपाययोजना किती त्वरेने अंमलात आणल्या यावर त्याची परिणामकारकता अवलंबून असते. जर साथीने उग्र स्वरुप धारण केले असेल व त्यानंतर उपाययोजना अंमलात आणल्या तर मर्यादित स्वरुपात उपलब्ध साधनांचा उपयोग साथ आटोक्यात आणण्यात किंवा लागण, मृत्यूसंख्या नियंत्रणात ठेवण्यास फारसा उपयोगी ठरत नाही.

साथ पसरताना किंवा तशी जोखमीची परिस्थिती असताना इतर शासकिय, अशासकिय यंत्रणा तसेच समाजाचा सहभाग अत्यंत महत्वाचा ठरतो. साथीच्या घटना लक्षात घेवून अशा विभागांना/संस्थांना समन्वयाव्दारे सहभागी करुन कृती योजना तयार केली तर ती निश्‍चितच उपयोगी ठरते.

एकात्मिक रोग सर्वेक्षण यंत्रणा ही संपुर्ण देशात कार्यान्वित आहे. आरोग्य सेवेतील सावधानता व साथ उदे्रक हाताळण्याची क्षमता बळकट करणेसाठी ती पुरक ठरेल. रोग सर्वेक्षण यंत्रणेतील प्रमुख घटक-

·         रोगांचे सर्वेक्षण

·         आरोग्य सेवेचे विविध स्तरावर सक्षमीकरण

·         प्रयोगशाळांचे बळकटीकरण

·         माहिती/आकडेवारीचे संकलन, विश्‍लेषण यासाठी जिल्हा सर्वेक्षण पथकांना संगणकाची सुविधा

·         खाजगी आरोग्य क्षेत्राचा अंतर्भाव

आय डी एस पी कार्यक्रम अंतर्गत प्रशासकिय रचना

·         केंद्र स्तर- केंद्र सर्व्हेक्षण पथक

·         केंद्र सर्व्हेक्षण समिती

·         राज्यस्तर- राज्य सर्व्हेक्षण पथक

·         राज्य सर्व्हेक्षण समिती

·         जिल्हास्तर- जिल्हा सर्व्हेक्षण पथक

·         जिल्हा सर्व्हेक्षण समिती.

 

प्रयोगशाळा बळकटीकरण - जिल्हास्तर, तालुका व प्रा आ केंद्र स्तरांवर कार्यरत असणार्‍या प्रयोगशाळामध्ये उपलब्ध सुविधामध्ये वाढ करणेत येवून साथजन्य आजारांविषयी तपासणीच्या सुविधा वाढविणेत आल्या आहेत.

माहिती व तंत्रज्ञानाचा समावेश - आय डी एस पी कार्यक्रम अंतर्गत संगणक कार्यप्रणालीचा वापर करण्यात येत आहे. सर्व जिल्हा सर्व्हेक्षण पथके राज्य व देशपातळीवर इंटरनेट सुविधाद्वारे जोडली गेली आहेत. जिल्हयांमधून प्राप्त होणारे साथरोग विषयक आकडेवारी दर आठवडयांस या सुविधेद्वारे शासनास सादर केली जात आहे. आय डी एस पी कार्यक्रम अंतर्गत नियमित सर्व्हेक्षणासाठी खालील आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

·         कीटकजन्य आजार- हिवताप.

·         जलजन्य आजार- तीव्र अतिसार (कॉलरा), विषमज्वर, कावीळ

·         श्‍वसनसंस्थेचे आजार- तीव्र श्‍वसनदाह

·         क्षयरोग

·         लसीकरणाने टाळता येणारे आजार- गोवर

·         निर्मुलनाच्या टप्प्यांतील आजार- पोलिओ

·         आंतरराष्ट्रीय सर्व्हेक्षणातील आजार- प्लेग,यलो फिवर

·         संवेदनशील सर्व्हेक्षण- एच.आय.व्ही

·         राज्यस्तरांवरील निवडक आजार- डेंग्यू,जे.ई,लेप्टोस्पायरोसिस

·         असांसर्गिक आजारांचे सर्व्हेक्षण- कुपोषण,रक्तदाब

आय डी एस पी कार्यक्रम अंतर्गत सर्व्हेक्षण कार्यपध्दती-

१)सिंडो्रमिक- उपकेंद्र स्तरांवर काम करणार्‍या कर्मचार्‍या कडून नियमित गृहभेटीमध्ये आढळून येणार्‍या साथीच्या आजारा बाबत लक्षण समूहावर आधारित संकलन करुन दर आठवडयांस प्रा आ केंद्र व जिल्हास्तरांवर विहित नमुन्यांत (फॉर्म एस) अहवाल सादर केला जातो.

२) प्रिझम्प्टीव्ह- प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय,शासकिय दवाखाने या स्तरांवर काम करणार्‍या वैद्यकिय अधिकार्‍यानी आंतररुग्ण व बाहयरुग्ण विभागांत आढळून येणार्‍या साथीच्या आजारांच्या रुग्णांची तपासणी करुन (क्लिनिकल एक्झामिनेशन)विहित नमुन्यंात (फॉर्म पी)दर आठवडयांस जिल्हा मुख्यालयांस अहवाल सादर केला जातो.

३) कन्फर्मड- प्रयोगशाळेमध्ये निश्‍चित निदान केलेल्या आजारा बाबत वर्गवारी करुन दर आठवडयांस विहित नमुन्यांत(फॉर्म एल) अहवाल सादर केला जातो.