सावित्रीबाई कन्या कल्याण पारितोषिक योजना
योजनेचे नाव
सावित्रीबाई कन्या कल्याण पारितोषिक योजना
योजना सुरु झाल्याचा दिनांक
१ एप्रिल २००७
योजनेची माहिती
शासन निर्णय क्र. साफुयो/२००४/१५११/प्रक्र २९७/कुक३ दिनांक २४/४/२००७नविन योजनेनुसार (दि.१ एप्रिल २००७ पासून) एक मुलीवर कुटूंब कल्याणशस्त्रक्रिया करुन घेणार्या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व मुलींचे नावेरु.आठ हजार राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांत व दोन मुलींनंतर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करुन घेणार्या व्यक्तीस रु.दोन हजार रोख व प्रत्येकमुलीच्या नावे रु.चार हजार या प्रमाणे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरुपांतदेण्यांत येते.या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
- या योजनेचा लाभ देणेकरिता कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करुनघेणारी व्यक्ती ही दारिद्रय रेषेखालील कुटूंबांतील असणे आवश्यक आहे.
- सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यांतील आधिवासी असणार्या कुटूंबानाच देय आहे.
- सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीने (पती अथवापत्नी)शासन मान्य संस्था अथवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायिक यांचेरुग्णालयांत केलेली असावी.
- सदर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ही लाभार्थीस (पती अथवा पत्नी) एक किंवा दोन मुलीच असाव्यात परंतु मुलगा मात्र नसावा.
कार्यक्रमाचे नाव
राष्ट्रीय साथरोग नियंत्रण कार्यक्रम
कार्याक्रमाची माहिती
साथीचे आजार होऊ नयेत म्हणून पूर्व नियोजन महत्वाचे आहे. जिल्हास्तरीयसाथरोग शीघ्र प्रतिसाद पथकामध्ये
- अति.जि.आ.अ.
- साथरोग वै.अ.
- प्रमुखरसायनशास्त्रज्ञ
- बालरोग तज्ञ
- फिजिशियन
- जिल्हा हिवताप
अधिकारीयांचा समावेश आहे.जिल्हास्तरीय आपत्कालीन वैद्यकीय मदत पथकामध्ये दोन वै.अ.आणि दहा कर्मचारी यांचा समावेश आहे.तसेच जिल्हास्तरावर माहे जून तेऑक्टोबर या जोखमीच्या कालावधीत २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यातयेते.संपर्क तुटलेल्या गावांसाठी विशेष उपाययोजना, स्थलांतरित कॅम्प्मध्येवैद्यकीय सुविधा, क्षेत्रीय प्रयोगशाळांची स्थापना, खाजगी वैद्यकीयव्यावसायिकांचा सहभाग, पुरेसा औषधसाठा, अतिरिक्त औषधसाठा, आरोग्य शिक्षण, परिसर स्वच्छता,इ. बाबत नियोजन करण्यात येते.जिल्हास्तरावर, प्रा.आ.केंद्र स्तरावर वउपकेंद्र स्तरावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.तसेच ग्रामपंचायत सार्वजनिक पिण्याच्यापाण्याचे स्त्रोताचे टी.सी.एल. पावडर वापरून शुद्धीकरण करणे बाबतचीकार्यवाही आरोग्य विभागाच्या देखरेखी खाली करण्यात येत आहे.जेथे सार्वजनिकपाणीपुरवठा स्त्रोत बंद आहे अशा ठिकाणी मेडीक्लोर द्रावण / क्लोरीनटॅबलेटयांचा वापर शुद्धीकरणासाठी करण्यात येत आहे.
स्थानिक वर्तमानपत्रातून जनतेला खालीलप्रमाणे आवाहन करण्यात आलेले आहे.
- पाणी उकळून गार करून पिण्यासाठी वापरावे.
- शुद्धीकरण केलेलेच पाणी पिण्यासाठी वापरावे.
- शुद्धीकरणासाठी आवश्यक मेडीक्लोर / क्लोरीनच्या गोळ्या नजीकच्या प्रा.आ.केंद्रात /आरोग्य कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध आहेत.
- जलजन्य आजाराच्या रुग्णांनी त्वरित जवळच्या प्रा.आ.केंद्राशी./ आरोग्य कार्चार्याशी संपर्क साधावा.
वर्ष | उद्रेक्ग्रस्त गावांची संख्या |
---|---|
2000 – 2005 | 55 |
2006 – 2010 | 19 |
2011 – 2016 | 10 |
वर्ष | जलजन्य उद्रेकात झालेले मृत्यू |
---|---|
२०००- २००५ | १३ |
२००६- २०१० | १० |
२०११- २०१६ | ०२ |
निष्कर्ष –आलेख क्र. १ व २ नुसार मागील १५वर्षात जलजन्य साथीचे उद्रेक्ग्रस्त गावे उल्लेखनीयरित्या कमी होतानादिसतात याची प्रमुख कारणे
- ग्रामपंचायत मार्फत निर्जन्तुकीकरणासाठीब्लिचिंग पावडरच्या वापरातील सातत्य
- लोकांमध्ये निर्जन्तुकीकरण केलेलेचपाणी प्यावे या बाबत झालेली मोठ्या प्रमाणात जनजागृती.
- ग्रामीणभागात शौचालयाच्या वापरात झालेली वाढ.
निष्कर्ष
- आष्टी तालुक्यात सर्वात जास्त कीटकजन्य साथीचे उद्रेक उदभवले याचीप्रमुख कारणे लोकं वस्त्यावर राहतात, शेतातील वस्त्यावरील घरात पुरेशाप्रमाणात खिडक्या नसल्यामुळे घरात कायम अंधार राहतो.घरातच रांजण तिरक्यास्थितीत वीट बांधकामात पक्के केल्यामुळे त्याच्यावर झाकाण ठेवता येत नाहो वव्यवस्थित धुता येत नाहीत.त्यामुळे डास निर्मितीला पोषक वातावरण आहे.
- वडवणी,गेवराई , बीड, माजलगाव, तालुक्यात घरामध्ये उघड्या सिमेंट च्याटाक्या व मोठ्या प्रमाणात रांजण असल्यामुळे डास निर्मितीला पोषक वातावरणआहे.तसेच या तालुक्यात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात असून कुटुंबातील सर्वसदस्य कापूस मशागत व वेचणी कामात सकाळपासून सायंकाळ पर्यंत शेतात कामासजातात त्यामुळे घरातील सिमेंट च्या टाक्या, रांजण, स्वच्छ करणे साफसफाईकामाकडे दुर्लक्ष दिसून येते.
- पाटोदा तालुक्यात ऊसतोडणीसाठी मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतरित होतातत्यामुळे घरातील उघडे माठ, रांजण, हौद, यामध्ये डासांची निर्मिती होतेत्याची साफसफाई करण्यासाठी कोणी घरात नसतात व पूर्वी तीव्र स्वरुपाची पाणीटंचाई असल्यामुळे पाण्याची साठवण केली जात होती.
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा