महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यक्रम
-
योजनेचे नाव
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा कार्यक्रम
-
योजना सुरु झाल्याचा दिनांक
एप्रिल २०१४ मध्ये जिल्ह्यात सुरु.
-
योजने विषयी माहिती
बीड जिल्ह्यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्प राज्याच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून एप्रिल 2014 पासून मोफत राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात 5 एएलएस व 14 बीएलएस अशा एकूण 19 रुग्णवाहिका अत्याधुनिक उपकरणे, औषधे, व प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी यांच्यासह रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. रुग्णवाहिका सेवा त्वरित उपलब्ध करण्यासाठी पुणे येथे स्वयंचलित व अत्याधुनिक संगणक प्रणालीसह एक कॉल सेंटर उभारण्यात आलेला आहे. संपूर्ण राज्यासाठी 108 हा टोल फ्री क्रमांक निश्चित केला असून आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास 108 क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णाचे नाव व ठिकाण, असलेली परिस्थिती नमूद करून रुग्णवाहिका पाठविण्यात येते व रुग्णांवर उपचार सुरु करूनच नजीकच्या रुग्णालयात रुग्णास पोचवायचे काम केले जाते. अशा प्रकारे मिळालेल्या उपचारामुळे रुग्णांचे व आपदग्रस्तांचे प्राण वाचवले जातात. हि सेवा सुरु झाल्यापासुण जानेवारी. 2025 अखेर 255067 लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
-
योजनेचा लाभार्थी (कोणासाठी योजना आहे)
महाराष्ट्रातील सर्व नागरिक
-
योजनेचा लाभ काय भेटणार
आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास 108 क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णाचे नाव व ठिकाण, असलेली परिस्थिती नमूद करून रुग्णवाहिका पाठविण्यात येते व रुग्णांवर उपचार सुरु करूनच नजीकच्या रुग्णालयात रुग्णास पोचवायचे काम केले जाते. अशा प्रकारे मिळालेल्या उपचारामुळे रुग्णांचे व आपदग्रस्तांचे प्राण वाचवले जातात.
-
योजनेचा लाभ कसा घेणार (अर्ज प्रक्रिया)
संपूर्ण राज्यासाठी 108 हा टोल फ्री क्रमांक निश्चित केला असून आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास 108 क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णाचे नाव व ठिकाण, असलेली परिस्थिती नमूद करून रुग्णवाहिका पाठविण्यात येते व रुग्णांवर उपचार सुरु करूनच नजीकच्या रुग्णालयात रुग्णास पोचवायचे काम केले जाते. अशा प्रकारे मिळालेल्या उपचारामुळे रुग्णांचे व आपदग्रस्तांचे प्राण वाचवले जातात.
-
उपरोक्त माहिती व्यतिरिक्त योजनेशी संबंधित पत्र, जीआर असेल तर सोबत जोडावे.
होय
-
योजनेच्या माहितीमध्ये सदर योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे / राज्य शासन पुरस्कृत आहे / संयुक्त आहे या बाबत स्पष्ट नमूद करावे.
संयुक्त
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा