बंद

    जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वैरण विकास योजना

    • तारीख : 01/01/2015 -

    पशुपालकांकडील दुधाळ जनावरांना हिरवा चारा उपलब्धतेकरिता तसेच शेतकऱ्यांना विविध वैरण विषयक पिकांची माहिती होण्याच्या दृष्टिने त्यांचेकडील स्वत:च्या जमिनीवर जनावरांना चारा उपलब्ध होण्याकरिता 100% अनुदानावर रुपये 1500/- च्या मर्यादेत चारा वैरणीचे बियाणे / बहूवार्षिक गवत प्रजातीची ठोंबे (यशवत, जयवंत) पुरवठा करण्यात येतो.

    लाभार्थी:

    या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देता येईल. तथापि अनु.जाती/ जमाती तसेच महिलांना प्राधान्य देण्यात येते.

    फायदे:

    किमान 3 ते 5 जनावरे आहेत अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.

    अर्ज कसा करावा

    जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क करावा.