एकात्मिक कुक्कुटपालन विकास कार्यक्रम एक दिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे
योजनेचे स्वरूप:
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमाअंतर्गत 50% अनुदानावर रु. 14750/- मर्यादेत प्रति लाभार्थी एक दिवशीय 100 कुक्कुट पिल्ले किंमत रु. 2500/- व अणि खाद्य रु. 12250 /- किंमतीच्या मर्यादेत पुरवठा करण्यात येतो. उर्वरित 50% रक्कम म्हणजेच रु. 14750/- लाभार्थीने स्वत: उभारुन त्यातुन एक दिवशीय 100 पिल्लांच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतूकीवरील खर्च, उर्वरित खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, खाद्याची भांडी, इत्यादीवरील खर्च करावा.
लाभार्थीनी खर्च करावायचा बाबीचा तपशील:
- खाद्यावरील खर्च खर्च करावयाची रक्कम: 11750/-
- वाहतूक खर्च करावयाची रक्कम: 500/-
- औषधी खर्च करावयाची रक्कम: 1000/-
- रात्रीचा निवारा खर्च करावयाची रक्कम: 1000/-
- खाद्याची भांडी खर्च करावयाची रक्कम: 500/-
- एकूण खर्च करावयाची रक्कम: 14750
लाभार्थी:
दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अत्यअल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी. सदर योजनेचा लाभ कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतील. लाभार्थी निवडताना 30% महिला लाभार्थी निवडण्याबाबत प्राधान्य देण्यात यावे.
फायदे:
एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमाअंतर्गत 50% अनुदानावर रु. 14750/- मर्यादेत प्रति लाभार्थी एक दिवशीय 100 कुक्कुट पिल्ले किंमत रु. 2500/- व अणि खाद्य रु. 12250 /- किंमतीच्या मर्यादेत पुरवठा करण्यात येतो.
अर्ज कसा करावा
ऑनलाइन मोड www.ahmahabms.com या पोर्टलवर. व्यापक प्रसिद्धी देऊन अर्ज मागविण्यात येतील. अर्ज स्विकारण्यासाठी एक महिन्याची मुदत राहील. मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.