बंद

    जिल्हा परिषद स्वनिधी योजना

    • तारीख : 03/03/2025 -

    योजनेचे नाव

    जिल्हा परिषद स्वनिधी योजना

    हदयरोग, कॅन्सर व किडणी या रोगांनी पिडीत असलेल्या रुग्णांना जि. स्वीय निधीतून आर्थिक मदत.

    योजनेचे स्वरुप माहिती

    या योजनेअंतर्गत ग्रामिण कार्यक्षेत्रातील लाभार्थीना खालील प्रमाणे आर्थीक मदत मिळते.

    1. हदय शस्त्रक्रिया करिता :- र.रु.15000/-
    2. कॅन्सर उपचार करिता :- र.रु. 15000/-
    3. किडणी रोपन करिता :- र.रु. 15000/-

    सदर योजनेचा लाभ देण्याकरिता जि. प. स्तरावर खालील प्रमाणे र्‍हदयरोग, कॅन्सर, किडणी करिता आर्थिक मदत समिती,जि.प.बीड ही समिती गठीत केलेली आहे.

    • मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, बीड – अध्यक्ष
    • मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड. – सदस्य
    • मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. बीड. – सदस्य
    • मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. बीड – सदस्य सचिव

    लाभार्थी कोण

    र्‍हदयरोग,कॅन्सर किंवा किडणी या रोगांनी पिडीत असलेली व्यक्ति.

    निकष व अटी

    • रुग्ण बीड जिल्हयातील ग्रामिण कार्यक्षेत्रातील असावा.
    • रुग्णांने शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयात उपचार /शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल.
    • ज्यांना वैद्यकिय परिपूर्ती मिळते अश्या कर्मचारी रुग्णांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.

    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

    • मा.जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.बीड यांचे नांवे लाभार्थीचा अर्ज
    • शासकीय किंवा शासनमान्य यादीतील रुग्णालयाचे
    • रोगनिदानासह, खर्चाचे अंदाजपत्रक.
    • रहिवाशी दाखला. (तलाठी यांचेकडील)
    • रेशनकार्ड पहिल्या व शेवटच्या पानांची प्रमाणित केलेली छायांकित प्रत.
    • उत्पन्नाचे प्रमाणपत्र.(तहसीलदार यांचेकडील)
    लाभार्थ्यास आर्थिक लाभ देण्यात आलेली वर्ष निहाय माहिती
    वर्ष एकूण प्रकरणे मान्य प्रकरणे एकूण रक्कम
    २०१२-१३ २९३ २३७ २३७००००/-
    २०१३-१४ २९५ २३० २३०००००/-
    २०१४-१५ १५२ १०९ १०९००००/-
    २०१५-१६ ९४ ४४ ४४००००/-
    २०१६-१७ ६१ ३१ ३१००००/-

    संबंधीत संपर्क अधिकारी

    • जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद,बीड.
    • दूरध्वनी क्रमांक – ०२४४२-२३०१८५.

    लाभार्थी:

    वर उल्लेख केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर उल्लेख केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा