जननी सुरक्षा योजना
जननी सुरक्षा योजना
ग्रामीण भागातील आशा कार्येकातिने जननीसुरक्षा योजनापात्र लाभार्थीच्या सर्व प्रसूतीपूर्व तपासण्या पूर्ण करूनघेतल्या असतील तर त्याची खात्री करून रु ३००/- देण्यात यावा लाभाथीची प्रसूती संस्थामध्ये करण्या करिताआशा कार्येकार्तीने लाभार्थी सोबत शासकीय आरोग्य संस्थेत गेल्यास लाभार्तीची प्रसूती शासकीय आरोग्य संस्थेत करण्यात आल्यास त्याची खात्रीकरून रु ३००/- देण्यात यावा.
- आशा कार्यकर्तीना पूर्ण लसीकरण केलेल्या बालकासाठी प्रति लाभार्थी रु १५०/- या प्रमाणे मोबदला देण्यात यावा.
- लसीकरण कार्यक्रमांतर्गत आशा कार्यकर्तीना रुपये १०० प्रति लाभार्थी हीरक्कम एक वर्षाचे आत बालकाचे पूर्ण लसीकरण झाल्यास आशा कार्यकर्तीलादेण्यात यावी.लसीकरण संरक्षणामध्ये बीसीजी, डीपीटी, हिपॅटायटीस-बी, तीनमात्रा, पोलिओ तीन मात्रा व गोवर लस १ मात्रा असे एकूण ११ मात्रा मिळालेस बालकाचे पूर्ण लसीकरण झाले असे गृहीत धरण्यात यावे.
- उर्वरित रु ५० /- हे रक्कम १ ते २ वर्ष वयोगटतील बालकाला पूर्ण लसीकरण झाल्यास आशा कार्यकर्तीला देण्यात यावी.
- कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी तिच्या कार्यक्षेत्रातीदारिद्गयरेषेखालील लाभार्थींना नसबंदीसाठी प्रवत्त केल्यास १५०/-प्रोत्साहन रक्कम देण्यात यावा तथापी ही रक्कम आशा कार्यकर्तीस ४ तासानंतरशस्त्रक्रिय लाभार्थीस भेट दिल्यानंतरच देण्यात यावी.
- सुधारित निर्मुलन कार्यक्रम :- आशा कार्यकर्तीने संदर्भित केलेल्यासंशयित रुग्णांमध्ये कुष्ठरोगामध्ये निदान झाल्यास प्रति रुग्ण रु.५०/-देण्यात यावेत. क्षयरोगावरील डॉट औषधोपचार विहित वेळापत्रकानुसार समक्षदिल्यास तिला प्रत्येक रुग्णामध्ये रुपये २५०/- देण्यात यावे.
- कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमः- आशा कार्यकर्तीने संदर्भीत केलेल्यासंशयीत रुग्णामध्ये कुष्ठरोगाने निदान झाल्यास प्रतिरुग्ण रु.५०/- देण्यातयावे. आशा स्वयंसेविकेने असांसर्गिक कुष्ठरुग्णावरील उपचार नियमितपणे पुर्णकेल्यास रु.१२०/- देण्यात यावे.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आशा कार्यकर्तीने
- हिवताप फॅल्पीपेरम केसला संपूर्ण उपचार पुर्ण केल्यास रुपये १०/- प्रती केस
- हिवताप व्हायव्हॅक्स केसला संपूर्ण उपचार पूर्ण केल्यास रुपये २५/- प्रती केस
- हिवतापाने गंभीर आजारी केस रुग्णालयात दाखल केल्यास रुपये २५/- प्रती केस
- गॅस्ट्रो, काविळ तसेच मलेरिया साथीची माहिती प्रथम कळविण्यासाठी २५/- प्रती साथ
- जलशुष्कतेमुळे आजारी असलेल्या ५ वर्षाखालील बालके रुग्णालयात वेळेवर पाठविल्यास रु.२५/- प्रती बालक
मोबदला
आशा कार्यपध्दतीने केलेल्या कामावर आधारित प्रेत्साहनपर रक्कम अदा करण्यातयेणार.त्यानुसार आशा कार्यकर्तीस शासनाने ठरविल्याप्रमाणे पुढीलप्रमाणेकामावर आधारित प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार.
गटप्रवर्तक
बीड जिल्हयातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्र करिता ६९ गटप्रवर्तक (ब्लॉक फेसिलीटेटर) या प्रमाणे गटप्रवर्तक कार्यरत आहेत.
गटप्रवर्तकांच्याभूमिका व जबाबदार्या
- गटप्रवर्तकाने आशा स्वयंसेविका व आरोग्य विभाग यांच्यामध्ये समन्वयसाधणे. (उदा. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका इत्यादी.)
- आशा स्वयंसेविकांना येणार्या अडचणी समजून घेणे व त्या गावपातळीवरसोडविणे तसेच आशांना त्यांच्या जबाबदार्यांची जाणीव करुन देत राहणे.
- आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा म्हणून सतत पाठपुरावा करणे.
- आशा स्वयंसेविकांना देण्यात येणार्या प्रशिक्षण पुस्तिका क्रं. १ (७दिवस), प्रशिक्षण पुस्तिका क्रं. २ (४ दिवस), प्रशिक्षण पुस्तिका क्रं. ३ (४ दिवस), प्रशिक्षण पुस्तिका क्रं. ४ (४ दिवस), व प्रशिक्षण पुस्तिकाक्रं. ५ (४ दिवस) ला आवश्यकतेप्रमाणे उपस्थित राहून गावभेटी दरम्यानझालेल्या प्रशिक्षणांची उजळणी घेणे.
- प्रत्येक आशा स्वयंसेविकेला गटप्रवर्तकाने महिन्यातून किमान २ भेटी देणे गरजेचे आहे.
- आशा स्वयंसेविकांची प्रा.आ.केंद्रस्तरावरील घेण्यात येणार्या प्रत्येकमासिक सभेस तसेच तालुकास्तरावरील सभेस गटप्रवर्तकाने उपस्थित राहणे वमार्गदर्शन करणे.
- आशा स्वयंसेविकांचा गावपातळीवर समन्वय साधण्यासाठी सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सहनियंत्रण समितीचेअध्यक्ष यांना भेटून आशा स्वयंसेविकांच्या भूमिकेविषयी माहिती देणे तसेचआशा स्वयंसेविकांच्या अडचणी यांच्या समन्वयातून सोडविण्यासाठी प्रयत्नकरणे.
- आशांचे कामाधारित मासिक अहवाल संकलित करणे, आशांचे रेकॉर्ड तपासणे, आशांना औषधीसाठा पुरविणे, मासिक अहवाल तयार करणे, तसेच मासिक अहवालप्रा.आ.केंद्र स्तरावर / तालुका स्तरावर / जिल्हास्तरावर अहवाल पाठविण्याचीव्यवस्था करणे.
आय.पी.एच.एस.अंतर्गत संकल्पना भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांकनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रकरिता लागणारे किमान निकष
- २४ x ७ सेवा
- स्वतःची इमारत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्था
- सुसज्ज प्रयोगशाळा, सर्व वैद्यकीय साधने व उपकरणांनी परिपुर्ण प्रसुतीगृह व शस्त्रक्रिया गृह
- २४ तास पाणीपुरवठा व वीजपुरवठा
- नवजात बालकांसाठी अत्यावश्यक सेवा
- तात्काळ संदर्भ सेवा, गरोदर माता तपासणी व नियमित लसीकरण वप्रसुतीपश्चात तपासणी व्यवस्थापन लवकरात लवकर व सुरक्षित गर्भपात, कुटुंबकल्याण सेवा स सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे नियोजन
- आर.टी.आय. व्यवस्थापन, आयुष सेवा
- माहिती, शिक्षण व प्रसिध्दी (एएनसी केअर, साथरोग नियंत्रण व सर्व राष्ट्रीय कार्यक्रम)
भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांकनानुसार उपकेंद्रमध्ये लागणारेकिमान निकष
- २४ x ७ सेवा
- स्वतःची इमारत, कर्मचारी निवासस्थान (२ एएनएम, १ एमपीडब्ल्यू व १ पीएलए)
- २४ तास पाणीपुरवठा व विजपुरवठा
- २४ तास प्रसुतीसेवा, तात्काळ संदर्भ सेवा, गरोदर माता तपासणी व नियमित लसीकरण
- प्रसुतीपश्चात तपासणी व्यवस्थापन व कुटुंब कल्याण सेवेचे व्यवस्थापन व कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी उत्तेजन
- साथरोग व्यवस्थापन व सामान्य बाहय रुग्णसेवा सेवा
- माहिती, शिक्षण व प्रसिध्दी (एएनसी केअर, साथरोग नियंत्रण व सर्व राष्ट्रीय कार्यक्रम)
संस्थेचे नाव | एकुण संख्या | आयपीएचएस करिता घेतलेल्या संस्था |
---|---|---|
प्रा.आ.केंद्र | ५६ | १४ |
प्रा.आ.केंद्र | २९७ | ० |
एकुण | ३५३ | १४ |
पायाभूत सुविधा विकास कक्ष
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सर्व स्तरावरील आरोग्यकेंद्रचे बांधकाम, सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रमध्ये सुधारणाकरणे इ. बाबींचा यात समावेशआहे.
आरोग्य केंद्रचे बांधकाम केंद्र शासनाच्या मानकानुसार लवकरात लवकरव्हावे व निधीचा सुयोग्य रितीने वापर व्हावा जेणेकरुन जास्तीत जास्तलोकांना आरोग्य विषयक सुविधा पुरविणे शक्य होईल यासाठी पुढील गोष्ठीकरण्यात आलेल्या आहेत.
- जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपसंचालक, आरोग्य सेवा, (संबंधीत आरोग्य मंडळे) व कार्यकारी अभियंता, सार्वजनिकबांधकाम विभाग यांच्या समितीने पायाभूत सुविधा कक्ष केला आहे.
पायाभूत सुविधा विकास कक्षाच्या जबाबदार्या व कर्तव्ये
- तांत्रिकदृष्टया सक्षम असलेल्या बांधकाम एजन्सीचे पॅनल तयार करण्यासाठीनिविदा मागविणे, यामध्ये स्थानिक बांधकाम एजन्सीला प्राधान्य देणे, एजन्सीची तांत्रिक पात्रता तपासून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी वकार्यकारी अभियंता पॅनेलला अंतिम स्वरुप देतील. यामध्ये किमान पाचएजन्सीचा समावेश असेल.
- पायाभूत सुविधा कक्षातील कनिष्ठ अभियंता, जिल्हा आरोग्य समितीला आरोग्यकेंद्रा बांधकामे व सध्याच्या आरोग्य केंद्राच्या दुरुस्त्या कोठे करणेआवश्यक आहे. याबाबतची यादी तयार करेल. तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हाशल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी हे त्यांना मदत करतील.
- पायाभूत सुविधा कक्षाकडून त्यानंतर या यादीवरील बांधकामाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले जाईल.
- जिल्हा आरोग्य समितीची कार्यकारी समिती अंदाजपत्रक व प्राधान्यक्रम लक्षात घेऊन बांधकाम अॅक्शन प्लॅन निश्चित करेल.
- प्लॅनच्या आधारे जिल्हा आरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती यांच्याअधिपत्याखालील बांधकामाच्या निविदा मागविल व सर्वात कमी दर असलेल्यानिविदाधारकाकडून काम करुन घेण्याचे निश्चित करेल.
- बांधकामावर पर्यवेक्षण करणे व दर्जा तपासण्याचे काम पायाभूत कक्षाचे राहिल.
- खर्चाचे विवरणपत्र जिल्हास्तरावर तसेच राज्य स्तरावर पाठविण्याची जबाबदारी पायाभूत सुविधा कक्षाची राहिल.
रुग्ण कल्याण समिती
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये आरोग्य सेवांच्या दक्षव्यवस्थापनेसाठी रुग्ण कल्याण समिती/रुग्णालय व्यवस्थापन समितीची संकल्पनामांडली आहे.
- ग्रामीण आरोग्य सेवा/रुग्णालयावर सामुदायिक पालकत्व विकासासितकरण्याच्या उदेदशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यातुन दवाखाने व आरोग्यकेंद्र मार्फत जनतेला उत्तरदायी अशा आरोग्य सेवा देण्यात उदे्देश आहे.
- आर्थिक तरतूद :- राज्य पातळीवर रुग्ण कल्याण समितीच्या स्थापनाप्रक्रियेला प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला १लाख रुपये व जिल्हा रुग्णालयाला (सिव्हिल हॉस्पिटल) ५ लाख तरप्रा.आ.केंद्गाला १ लाख रुपये निधी प्राथमिक सहाय्य निधी स्वरुपात दिलागेला आहे. राज्य सरकारमार्फत या समित्यांना आरोग्य सेवा शुल्क निधीउपभोक्ता शुल्क/देणगी मुल्य ठेवण्याची अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे हेसहाय्य मिळविण्यास या समित्या पात्र ठरतात.
कामे व जबाबदार्या
- प्राथमिक आरोग्य केंद्रच्या/ग्रामीण रुग्णालय/जिल्हा रुग्णालयनियमावलीनुसार साधनसामुग्री, साहित्य, रुग्णवाहिका (देणगी स्वरुपात, भाडयाने किंवा इतर प्रकारे जसे, बँकेकडून कर्ज घेऊन) उपलब्ध करुन द्यावी.
- प्राथमिक आरोग्य केंद्रची/ग्रामीण रुग्णालय/जिल्हा रुग्णालय इमारतराज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांवरुन व त्यांच्या अनुमतिने आवश्यकअसल्यास वाढविणे.
- प्राथमिक आरोग्य केंद्गांची/ग्रामीण रुग्णालय/जिल्हा रुग्णालय इमारत (राहण्याच्या इमारतीसह) गाडी व साधन सामुग्री यांची देखभाल करणे.
- प्राथमिक आरोग्य केंद्रच्या/ग्रामीण रुग्णालय/जिल्हा रुग्णालयदररोजच्या प्रक्रिया हय कायमस्वरुपी व पर्यावरणाशी समतोल ठरणार्याअसाव्यात. उदा.शास्त्रोक्त पध्दतीने रुग्णालयाीन कचर्याची विल्हेवाट, सौरउर्जेवर चालणारी यंत्रणा किंवा जलसंधारण.
- रुग्णास आवश्यक असलेल्यासेवा पर्याप्त स्वरुपात दर्जेदारपणे उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही रुग्ण कल्याण समिती करेल.
- गरजु व गरीब रुग्णांसाठी निःशुल्क सेवा (कॅशलेस हॉस्पिटलायझ्ड उपचार) मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे.
- रुग्ण कल्याणासाठी आवश्यक अशा योजना राबविणे. उदा.प्रसुती झालेल्या महिलेस साडी देणे, बाळासाठी उबदार कपडे देणे (आंगडे-टोपडे)
प्राथमिक आरोग्य केंद स्तरावरील रुग्ण कल्याण समिती
- प्राथमिक आरोग्य केंद्रच्या रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळाची रचना
- अध्यक्ष :- प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य.
- उपाध्यक्ष :- तालुका आरोग्य अधिकारी
सदस्य
- पंचायत समितीचे सदस्य
- प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे आहे त्या गावचे सरपंच
- ग्राम पंचायतीची महिला सदस्य
- स्थानिक अशासकीय संस्था
- स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे सदस्य
- पंचायत समितीच्या अध्यक्षांशी निवडलेला अनुसुचित जातीचा प्रतिनिधी
- एकात्मिक बालविकास अधिकारी (सीडीपीओ )
- गटविकास अधिकारी ( बीडीओ )
- गटशिक्षण अधिकारी (बीईओ)
- नगरपरिषदेच्य अध्यक्षांनी निवडलेले नगरसेवक (प्रा.आ. केंद्र नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात असल्यास)
- स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक/वैद्यकीय अधिकारी आयुष
सदस्य सचिव
प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी वरीलसदस्यांची त्रैमासिक बैठक घेण्यात यावी.
कार्यकारी समितीची सरंचना
अध्यक्ष
तालुका आरोग्य अधिकारी
सदस्य
- मुख्य सेविका (अंगणवाडी)
- स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक
- पंचायत समितीच्या नियामक मंडळातील सदस्य
- ग्राम पंचायतीच्या ग्राम,आरोग्य,पोषण,पाणीपूरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष
- आरोग्य विस्तार अधिकारी
- शिक्षणखात्याचे विस्तार अधिकारी
- वैद्यकीय अधिकारी आयूष
सदस्य सचिव
प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी समितीची बैठक दर महिन्याला घेण्यात यावी.
- प्राथमिक आरोग्य केंद्ग आंतररुग्ण व बाहयरुग्ण विभागातील दिलेलयासेवांचा आढावा घेणे व पुढील महिन्यात येणार्या सेवांचे उदिदष्ट ठरविणे.
- मागील महिन्यात कार्यक्षेत्रात देण्यात आलेल्या आरोग्य सेवांचा आढावा घेऊन पुढील महिन्याकरिता उदिदष्ट ठरविणे.
- देखरेख समितीचे अहवाल पाहून त्यावर उपाययोजना ठरविणे.
बैठकीसाठी विषयसुची
उपजिल्हा रुग्णालय/ग्रामीण रुग्णालयाच्या पातळीवरील रुग्ण कल्याण समिती बंधमुक्त निधी
ग्राम आरोग्य निधीच्या विनीयोगाबाबत मार्गदर्शकसूचना
- जिल्हयातील प्रत्येक महसूली गावात समितीची स्थापना करुन समितीसदस्यांच्या प्रशिक्षणानंतर दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात बंधमुक्त निधीमिळेल. या निधीतून त्यांना खालील कामे करता येतील.
- यातुन गरजेच्या वेळी पैसे काढू शकतील व ते त्यानंतर हप्त्यांमध्ये भरावे लागतील.
- गावपातळीवरील कोणतेही सार्वजनिक आरोग्याचे कार्यक्रम जसे स्वच्छतामोहिम,शालेय आरोग्य कार्यक्रम, एकात्मिक बाल विका सेवा, अंगणवाडी पातळीवरीलकार्यक्रम, कुटुंब सर्वेक्षण इत्यादीसाठी हा निधी वापरता येईल.
- अपवादात्मक परिस्थितीत गरजू, निराधार महिला आणि गरीब कुटूंबासाठी हा निधी आरोग्य विषयक तातडीच्या गरजा भागविण्यासाठी वापरता येईल.
- बंधमुक्त निधी हा स्थानिक स्तरावरील सामाजिक कृतींसाठी स्त्रोत आहे आणितो फक्त अशा सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरला जायला हवा ज्यामध्येएकापेक्षा जास्त कुटूंबाचा फायदा होईल. पोषण, शिक्षण आणि स्वच्छता, वातावरणाची सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम हे निधी वापरण्यासाठीमहत्वाची क्षेत्रे असतील.
प्रत्येक गाव हे या समितीला आणखी अतिरिक्तनिधी मिळवून देण्यासाठी वाटा उचलू शकेल. जे गाव ग्राम आरोग्य निधीच्यरु.१०,०००/- मध्ये समाजाचा आर्थिक वाटा उचलेल त्या गावाला अतिरिक्त मोबदलाआणि आर्थिक मदत दिली जाऊ शकते. या निधीचा उददेश हा स्थानिक स्तरावर कार्यवाही शक्य व्हावी आणि सार्वजनिकआरोग्याच्या ग्राम पातळीवरील उपाययोजनांना प्राथमिकता देणे हा आहे.
अ.क्र. | लोकसंख्या | बंधमुक्तनिधी |
---|---|---|
१ | ५०० पर्यंत | रु.३,०००/- |
२ | ५०१ ते १,५०० | रु.५,०००/- |
३ | १,५०१ ते ५,००० | रु.१०,०००/- |
४ | ५,००१ ते १०,००० | रु.२४,०००/- |
५ | १०,००१ पेक्षा जास्त | रु.३०,०००/- |
उपकेंद्रपातळीवरील बंधमुक्त निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शकसुचना
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा भाग म्हणून असे प्रस्तावित केलेआहे की प्रत्येक उपकेंद्रसाठी रु.१०,०००/- बंधमुक्त निधी देण्यात येईलज्यामधून कमी खर्चाच्या तातडीच्या बाबींसाठी खर्च करण्यात येईल.
- हा निधी सरपंच व आरोग्य सेविका यांच्या संयुक्त बँक खात्यामध्ये ठेवला जाईल.
- कोणत्या बाबींसाठी निधी खर्च करावयाचा आहे त्याचा निर्णय ग्राम आरोग्यकमिटीच्या मान्यतेने होईल. व त्याची कार्यवाही आरोग्य सेविका करेल. ज्याभागात उप केंद्रचे मुख्यालय नाही उपकेंद्गाच्या कार्यकक्षेत एकापेक्षाजास्त ग्रामपंचायतींचा समावेश् असेल, त्याठिकाणी उपकेंद्गाच्यामुख्यालयाच्या ठिकाणी असलेली ग्राम आरोग्य कमिटी कृति कार्यक्रमाला मान्यता देईल हा निधी उपकेंद्रतर्गत असलेल्या कोणत्याही गावांकरिता वापरतायेईल.
- हा बंधमुक्त निधी वैयक्तिक गरजेऐवजी सार्वजनिक फायदयासाठी वापरण्यातयावा तातडीच्या वेळी संदर्भसेवा आणि वाहतुक व्यवस्थेसाठी हा निधी वापरतायेईल.
- हा निधी खालील बाबींसाठी वापरण्यात येऊ शकेल.
- उपकेंद्रतील किरकोळ बदल पडदे, नळ दुरुस्ती, बल्ब बसविणे इतरक किरकोळ दुरुस्ती जी स्थानिक स्तरावर करता येईल.
- उपकेंद्र स्वच्छतेसाठी खास करुन प्रसुतीनंतर उपकेंद्गाच्या स्वच्छतेसाठी खर्च.
- तातडीच्या वेळी योग्य त्या संदर्भसेवेच्या ठिकाणी करावयाच्या वाहतुक व्यवस्थेसाठी
- साथीच्या काळात नमुने पाठविण्याच्या वाहतुकीसाठी
- उपकेंद्रसाठी लागणार्या बॅडेजससारख्या वस्तुची खरेदी
- सार्वजनिक ठिकाणाच्या उपयोगासाठी लागणार्या ब्लिचींग पावडर आणि जंतुनाशकांची खरेदी.
- परिसर स्वच्छतेसाठी जसे साठलेल्या पाण्याचा निचरा करणे किंवा अळीनाशक उपायोजनांसाठी मंजूरी.
- आशा कार्यकर्तींना आरोग्यविषयक कामांसाठीचा मोबदला.
- बंधमुक्त निधी कोणत्याही वेतन, वाहन खरेदी अथवा ग्रामपंचायतीसाठीच्या खर्चासाठी वापरण्यात येऊ नये.
प्राथमिक आरोग्य केंद्र /ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालयासाठीबंधमुक्त निधीच्या व वार्षिक देखभाल निधी विनियोगासाठी मार्गदर्शक सूचना
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक प्राथमिकआरोग्यकेंद्रला दरवर्षी रुपये २५,०००/- बंधमुक्त निधी स्थानिक आरोग्यउपाययोजनांसाठी मिळतील. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्गाला वार्षिकदेखभाल निधी म्हणून रुपये ५०,०००/- भौतिक सुधारणा व देखभालीसाठी मिळतील.
- पाणीपुरवठा, स्वच्छतागुहे त्यांचा वापर आणि देखभाल यांना प्राधान्यराहील. प्रत्येक कृतीचे नियोजन अशारितीने हवे जेणेकरुन त्या बंधमुक्तनिधीचा परिणाम वेगळेपणाने दिसुन येईल.
प्राथमिक आरोग्य केंद्र /ग्रामीणरुग्णालय/उपजिल्हा रुग्णालयाचा बंधमुक्त निधी हा संबंधित रुग्ण कल्याणसमिती/ रुग्णालय व्यवस्थापन समितीच्या बॅक खात्यामध्ये ठेवावा.प्राथमिक आरोग्य केंद्र /ग्रामीण रुग्णालय/उपजिल्हा रुग्णालयाचा रुग्णकल्याण समितीने वार्षिक देखभाल निधीतुन काम ेकरणे व त्यावर देखरेख ठेवणेआवश्यक आहे. हे दोन्ही निधी रुग्ण कल्याण समितीमार्फत खर्च करण्यात येतील.ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती
ग्रामीण जनतेला पिण्याचे शुध्द पाणी पुरविणे, कुपोषण व आरोग्यविषयककार्यक्रम हे एकमेकांशी निगडीत असल्याने ग्रामस्तरावरुन त्यांची अंमलबजावणीकरताना या कामांसाठी ग्रामस्तरावर वेगवेगळया समित्या गठीत न करता हे कामग्राम स्तरावरील एकाव समितीकडून करुन घेणे आवश्यक असल्याने ग्रामस्तरावरीलग्राम आरोग्य समितीचे ग्राम पाणीपूरवठा व स्वच्छता समितीमध्ये विलिनीकरणकरुन या समितीचे नामकरण ग्राम आरोग्य पोषण पाणीपूरवठा व स्वच्छता समिती असेकरण्यात आले.
समितीची रचना
- ५० टक्के महिला सदस्य असाव्यात.
- महसुली गावांमधील प्रत्येक भागातील समस्या सोडविण्याच्या दष्टीने, अनुसुचित जाती, जमातीच्या सदस्यांना प्राधान्य देण्यात यावे.
- आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका (एएनएम)
बचतगट प्रमुख, पालक
शिक्षक संघटनेचेसचिव, गावात हक्काधारित दष्टीकोनातून कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेनेसुचविलेले प्रतिनिधी व लाभार्थींचे प्रतिनिधी हे या समितीला स्त्री आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्यास सहकार्य करतील.
प्रशिक्षण
या समितीच्या सदस्यांना गाव पातळीवरील आरोग्य सेवांवर देखरेख वनियोजन करता यावे . तसेच आरोग्य उपकेंद्रची आखणी करता यावी यासाठी आवश्यकते नेतृत्व प्रशिक्षण त्यांना दिले जाईल.
आर्थिक तरतूद
- जिल्हयातील प्रत्येक महसूली गावात समितीची स्थापनाकरुन समित्या सदस्यांच्या प्रशिक्षणानंतर लोकसंख्येच्या प्रमाणात, बंधमुक्तनिधी मिळेल. या निधीतून त्यांनी पूढील कामे करावीत.
- फिरत्या निधीचा स्वरुपात/ आरोग्य गरजांसाठी तात्पुरत्या वापरासाठी (रिव्हॉल्विंग फंड) या निधीचा वापर करता येईल.
- या निधीतून आरोग्य शिबिरांचे आयोजन, ग्राम स्वच्छता मोहिम, शालेयआरोग्य मोहिम, अंगणवाडी मार्फत कार्यक्रम घेणे कुटूंब सर्वेक्षण, तसेचगावाचा आरोग्य कृती आराखडा तयार करणे यासारखे कार्यक्रम राबविता येतील.
- ग्राम आरोग्य पोषण, पाणीपूरवठा व स्वच्छता समितीच्या उपलब्ध निधीचेखाते अंगणवाडी सेविका आणि ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपूरवठा व स्वच्छतासमितीचे अध्यक्ष या दोघांच्या संयुक्त नावाने असेल.
- ग्राम आरोग्य, पोषण पाणीपूरवठा व स्वच्छता समितीचे कामे व जबाबदार्या :-
- आरोग्य कार्यक्रमाबद्दल जनजागृती करणे, विशेषतः शासकीय आरोग्य सेवांशी संबंधीत जनतेच्या हक्काबददल माहिती देणे.
- लोक सहभागातून, आरोग्य समस्यांचा विचार करुन ग्राम आरोग्य योजनेबददल चर्चा घडविणे व योजना तयार करणे.
- ग्राम पातळीवरील आरोग्य आणि पोषणासंबंधीत महत्वाचे मुददे व प्रश्नांवरऊहापोह करणे व त्या संदर्भात संबधीत अधिकार्यांपर्यंत अभिप्राय देणे, गावाचा वार्षिक आरोग्य प्रगती अहवाल ग्रामसभेत जाहिर करणे.
आरोग्य सेविका (एएनएम) व बहुउदेदशीय आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू) यांच्यासेवा
- ते पूर्वनिर्धारित दिवशी गावभेटी देतील व ठरलेली कामे पार पाडतीलयावर लक्ष ठेवणे. तसेच पोषणासंबंधीत आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविकेच्याजबाबदार्यांवर लक्ष ठेवणे.
- गावातील आरोग्य समर्या व महत्वाच्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी कुटूंब सर्व्हेक्षण करुन माहिती गोळा करणे.
- गावात आरोग्य रजिस्टर (नोंदवही) अंगणवाडी सेविकेने ठेवणे. जास्त कोणतेकार्यक्रम राबविले व किती खर्च झाला याची नोंद असावी. ही नोंदवही वेळोवेळीएएनएम/एमपीडब्ल्यू/ग्रामपंचायतीने तपासणी किंवा सार्वजनिक तपासणी करताउपलब्ध ठेवणे.
- पंचायत समितीने ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचा आढावा घेऊन त्यांचे झालेले काम व प्रगती पहावी.
- जिल्हा आरोग्य समितीने त्यांच्या बैठकीत ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती च्या कामाचा आढावा घ्यावा.
- ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने गोळा केलेली माहिती जिल्हा नियोजना व देखरेख पथकाने ठेवणे अपेक्षित आहे.
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा