आशा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विशेषतः ग्रामीण जनतेला आरोग्यसेवा यशस्वीरीत्या आणि सातत्याने मिळाव्या हा दृष्टीकोन समोर ठेऊन केंद्रशासनाने हा महत्तवकांक्षी योजना सुरु केलेली आहे. ग्रामीण पातळीवरअभियानाचा एक भाग म्हणून प्रत्येक गावांमध्ये स्त्री आरोग्य स्वयंसेविकाआशा ची निवड करण्यात येत आहे. ही मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्तीअसेल. आशा ही स्थानिक गावांतील रहिवासी असुन किमान तिचे शिक्षण ८ वीपर्यंत झालेले असावे. वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे विवाहीत/विधवा/घटस्फोटीत/परितक्त्या) यांना प्राधान्य देण्यात यावे तसेच सामाजिक कार्याची निवडअसलेली असावी अशी अपेक्षा आहे. तिची निवड स्थानिक ग्रामपंचायत करणार आहेत्यामुळे ती ग्रामस्थ व आरोग्य सेवेतील दुवा म्हणून गावांमध्ये काम करेल.निवडीनंतर १ वर्षामध्ये तिला २३ दिवसाचे प्रशिक्षण पाच टप्प्यांमध्ये पुर्णकरावयाचे आहे. या ज्ञानानुसार व कौशल्यानुसार गावामध्ये स्थानिक भाषेतमाहिती देऊन ग्रामस्थांना ती आरोग्य सेवेचे महत्व पटवून देईल. त्यामुळेसमाजात स्विकारण्याचे प्रमाणे वाढेल.आशा ही सरकारी कर्मचारी अथवा मानधनी कर्मचारी नसून तिला केलेल्याकामानुसार मोबदला किंवा आर्थिक फायदा देण्यात येईल.ग्राम , आरोग्य, पोषणपाणी पुरवठा व स्वच्छता समितीची सदस्य या नात्याने ग्रामपातळीवरील आरोग्यविषयक योजनेचा आराखडा तयार करणे व त्यानुसार अंमलबजावणी होत आहे किंवा कसेयाबाबत समितीला वेळोवळी माहिती देऊन सदस्यांच्या सुचनानुसार कार्यवाही करणेहा तिच्या कामाचा महत्वपूर्ण् भाग असेल. लोकांना किरकोळ आजारांसाठीऔषधोपचार करणे व विशेष प्रसंगी उदा. गरोदर माता, बालके इ.यांना आरोग्यसंस्थेत घेऊन जाणे हे सुद्धा आशा स्वयंसेविकेकडून अपेक्षित आहे. ज्यामुळेती ग्रामस्थांना विश्वास संपादन करु शकेल.
आशा कार्यकर्तीची आठ कर्तव्ये
- गाव पातळीवरील आरोग्य नियोजन
- लोकांच्या आरोग्य संदर्भात वागणुकीतील बदलांसाठी सुसंवाद
- अंगणवाडी कार्यकर्ती, दाई, आरोग्यसेविका, आरोग्यसेविक, आरोग्य सेवक यांच्याशी समन्वय ठेवणे.
- समुपदेशन
- रुग्णास रुग्णालयात पोहचविण्यास सहाय्य करणे.
- प्रथमोपचार
- पो होल्डर (औषधी साठा ठेवणे)
- कॉर्ड व नोंदी ठेवणे.
कामाचे नियोजन
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा