जननी सुरक्षा योजना
योजनेचे नाव
जननी सुरक्षा योजना
योजना सुरु झाल्याचा दिनांक
सन २००५-०६
योजनेची माहिती
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननीसुरक्षा योजना सन २००५-०६ पासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.डॉक्टर, नर्स यांसारख्या कुशल व्यक्तींकडून आरोग्य संस्थेतच बाळंतपण करवूनघेण्यास प्रोत्साहन मिळावे ज्यामुळे माता मृत्यू व नवजात अर्भक मृत्यूदरकमी करावा या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.ही योजना १०० टक्के केंद्रसरकारद्रारा प्रायोजित करण्यात आली आहे. यायोजनेमार्फत दारिद्रय रेषेखालील महिलांना प्रसुतिपूर्व व प्रसुतिपश्चातकालावधीत स्वतःची काळजी घेता यावी. यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ज्यामुळेत्यांना संस्थेत (प्रसुतीगृहात) बाळंतपण करणे शक्य होईल.
लाभार्थींची पात्रता व योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
- सदर गर्भवती महिला अनूसुचित जाती/अनुसुचित जमातीतील व दारिद्गयरेषेखालील ग्रामीण भागातील असावी. दारिद्गय रेषेखालील कुटुंबासाठी दिलेलेनोंदणी पत्र किंवा शिधापत्रिका सादर करावी लागेल. सदर कागदपत्र उपलब्धनसल्यास संबंधीत तहसिलदार किंवा तलाठी किंवा संबंधीत ग्रामपंचायतीने दिलेलेप्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
- सदर महिलेचे वय १९ किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
- सदर योजनेचा लाभ पहिल्या दोन अपत्यांपर्यंत राहिल.
- १२ आठवडयापूर्वी गर्भवती स्त्रीने आरोग्य केंद्रत नोंदणी करावी.
- गरोदरपणाच्या कालावधीत नियमित पाच वेळा आरोग्य केंद्रत तपासणी करुन घ्यावी.
- गरोदर मातांची नोंदणी करतेवेळी माता बाल संगोपन कार्ड व जननी सुरक्षा योजनेचे कार्ड भरुन मातेसोबत दयावे.
- गरोदर माता प्रसुतीसाठी माहेरी किंवा इतर ठिकाणी गेल्यास तिने जननीसुरक्षा योजनेचे कार्ड सादर केल्यास तिला जननी सुरक्षा योजनेचे अनुदानधनादेशाने त्वरीत दिले जाईल. तशी नोंद जननी सुरक्षा कार्डवर घेण्यात येईल.त्यामध्ये क्षेत्राचा निकष लावला जाणार नाही.
- ज्या गरोदर मातेची प्रसूती घरी झालेली आहे. अशा मातेस बाळंतपणानंतर ७ दिवसात रु.५००/- Online देण्यात येतील.
- ज्या गरोदर मातेचे बाळंतपण शासकीय आरोग्य संस्थेत झालेले आहे त्यांनाशहरी भागासाठी रु.६००/- व ग्रामीण भागासाठी रु.७००/- Online देय राहिल.
- प्रसुती शासकीय आरोग्य संस्थेत झाल्यानंतर सदरहू माता दवाखान्यात कमीतकमी ४८ तास भरती राहिल अशा रितीने त्या महिलेस उद्युक्त करुन या कालावधीतमातेच्या व बालकाच्या आरोग्याची तपासणी औषधोपचार व देखभाल वैद्यकीयअधिकर्यांकडून केली जाईल.
- मानांकित खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व स्वयंसेवी संस्थांच्या मानांकित केलेल्या रुग्णालयात झालेल्या प्रसुतीपैकी पात्र लाभार्थींना जननी सुरक्षा योजनेचा लाभ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेमार्फत देण्यात येतो.
ग्रामीण भागात शासकीय अथवा खाजगी संस्थेत प्रसुती काळातील जोखमीमुळेसिझेरियन शत्रक्रिया करावायाची झाल्यास व त्यासाठी शासकीय रुग्णालयात तज्ञवैद्यकीय अधिकार्यांना त्यांची सेवा देण्यासाठी रु.१५००/- मानधन किंवाशस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयात झाल्यास रु.१५००/- अनुदान खाजगी रुग्णालयासदेण्यात येईल. तसेच मानांकित/नामनिर्देशित करण्यात आलेल्या प्रसुतीरुग्णालयात प्रसुती झाल्यास त्या संस्थानाही वरील अनुदान देय राहिल.
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा