राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
परिचय
योजना सुरू झाल्याचा दिनांक दि.१२ एप्रिल २००५
भारत सरकारने दि.१२ एप्रिल २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरवात केली. ग्रामीण भागातील गरिब महिला आणि मुलांपर्यंतगुणवत्तापुर्ण, अद्यावत व परिणामकारक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणातपोहोचविणे हे या मिशनचे ध्येय आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हा सातवर्षामध्ये राबविला जाणारा कार्यक्रम आहे. या विशिष्ट कालमर्यादेतअभियानात गाठलेल्या उदिदष्टयांचा प्रगती अहवाल सरकारद्वारे केला जाईल.
- अर्भकमृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करणे.
- सार्वजनिक स्वच्छता, पोषक आहार, पाणीपुरवठा यासारख्या मुलभूत सेवांबाबत सार्वजनिक आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध करुन देणे.
- स्थानिक आरोग्य नियंत्रणाबरोबरच इतर संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रण करणे.
- सर्व लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळणेबाबत उपाययोजना आखणे.
अ.क्र. | आरोग्य निर्देशांक | भारत | महाराष्ट्र |
---|---|---|---|
१ | अर्भक मृत्यू दर | 39 (२०११-१३) | 22 (२०११-१३) |
२ | माता मृत्यू दर | १६७ (२०११-१३) | ६८ (२०११-१३) |
३ | एकुण जनन दर | २.३ (२०१४) | १.८ (२०१४) |
स्रोत स्रोत :- एसआरएस
उदिदष्टये गाठण्यासाठी अभियांनातर्गत अवलंबिलेली काही प्रमुख धोरणे
- आरोग्य सेवेअंतर्गत होणारा एकुण खर्च जी.डी.पी.च्या सध्याच्या ०.९ टक्के वरुन २ ते ३ टक्के पर्यंत वाढविणे.
- सार्वजनिक आरोग्य सेवांचे पालकत्व, नियंत्रण व व्यवस्थापन स्थानिकसंस्थांकडून व्हावे यासाठी पंचायत प्रतिनिधीचे प्रशिक्षण घेऊन त्यांनायाविषयी अवगत करणे.
- प्रत्येक गावामध्ये महिला आरोग्य कार्यकर्ती आशा ची निवड करणे.
- ग्राम, आरोग्य,पोषण, स्वच्छता व पाणीपुरवठा समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात ग्राम आरोग्य योजना बनवणे.
- उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील सेवांचा दर्जा सुधारणे. (आयपीएचएस इयत्ता.)
- स्थानिक पातळीवर ग्राम आरोग्य नियोजन आराखडा बनविणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
- सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये स्थानिक पारंपारिक उपचार पध्दती, आयुष (आर्युर्वेद, रोग, निसर्ग उपचार, युनानी, सिध्द, होमीओपॅथी) यांचा समावेशकरणे.
- विविध समांतर (व्हर्टीकल) आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमांना राष्ट्रीय राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर एकात्मिक रुप देणे.
लाभार्थी:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
फायदे:
वर उल्लेख केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा