लेक लाडकी योजना
योजनेचे स्वरूप
लेक लाडकी योजना शासन निर्णय महिला बाल विकास विभाग शासननिर्णय क्रं.एबावि/2022 /प्र.क्र. 251/का-6 दिनांक 30/10/2023 अन्वये जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक 01 एप्रिल 2023 पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना या महत्वकांक्षी योजनेची सुरुवात झालेली आहे.
प्रमुख उदिष्टे
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्म दर वाढविणे.
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे, शाळाबाहय मुलींचे प्रमाण 0 वर आणणे.
- मुलीचा मृत्यु दर कमी करणे व बालविवाह रोखणे.
- मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्याने मुलींचे वय 18 वर्ष पुर्ण होईपर्यंत एकुण रु.101000/- ( एक लक्ष एक
हजार रुपये फक्त ) या रकमेचा लाभ देण्यात येणार आहे.
लाभार्थी पात्रतेचे अटी व शर्ती
- ही योजना पिवळया व केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंबामध्ये दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्मला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागु राहिल. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.
- पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या आपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्यांने कुटूंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिर्वाय राहिल.
- तसेच दुस-या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुंलीना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल. मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- दिनांक 1 एप्रील 2023 पुर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुस-या मुलीस किंवा जुळया मुंलीना (स्वतंत्र) हि योजना अनुज्ञेय राहिल. मात्र मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- लाभार्थीचे कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहिल.
- लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न् रक्क्म रुपये 1 लक्ष पेक्षा जास्त नसावे. आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थीचा जन्म् दाखला (वार्षिक उत्प्न्न् एक लाखापेक्षा जास्त नसावे), या बाबत तहसिलदार / सक्ष्म अधिकारी यांचा दाखला.
- लाभार्थीचे आधारकार्ड ( प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)
- पालकाचे आधार कार्ड
- बँकच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायाकिंत प्रत
- रेशन कार्ड (पिवळया अथवा केशरी छायाकिंत प्रत)
- मतदान ओळखपत्र ( शेवटच्या लाभाकरीता 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नांव असल्याचा दाखला)
- संबधित टप्यावरील लाभाकरीता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबधित शाळेचा दाखला.
- कुटंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, अंतिम लाभाकरीता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. ( अविवाहीत असल्या बाबत लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र)
लाभार्थी:
महाराष्ट्रातील मुली
फायदे:
मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्याने मुलींचे वय 18 वर्ष पुर्ण होईपर्यंत एकुण रु.101000/- ( एक लक्ष एक हजार रुपये फक्त ) या रकमेचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा
संबंधीत विभागाशी संपर्क साधा