वित्त विभाग
वित्त विभाग,जिल्हा परिषद,बीड
प्रस्तावना
वित्त विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण 14 विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे .मुख्य कार्यकारीअधिकारी /अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणाऱ्या जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांकडील योजनाविषयक / आर्थिक बाबींविषयक प्रस्ताव – प्रकरणे यांची छाननी करून आर्थिक / लेखाविषयक अभिप्राय देवून सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.
जिल्हा परिषदेचे सर्व आर्थिक व्यवहार संदर्भात कार्यवाही वित्त विभागाकडून करण्यात येत असते.जिल्हा परिषदेतील वित्त विभागाचे प्रमुख मुख्य लेखा व वित्त अधिकारी असून ते महाराष्ट्र वित्त व लेखा उपसंचालक संवर्गातील अधिकारी आहेत.जिल्हा परिषदेच्या वतीने ते आहरण व संवितरण अधिकारी / लेखांकन अधिकारी अर्थसंकल्पीय अंदाज या बाबी तसेच आर्थिक नियमांच्या अंमलबजावणी संबंधी मा. जिल्हा परिषदेचा वित्तीय सल्लागार व प्राथमिक लेखा परिक्षक म्हणून काम पाहतात. वित्त विभागात मुख्य लेखा व वित्त अधिकारी (गट-अ वरिष्ठ) उपसंचालक संवर्गाचे 1 पद , उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी (गट-अ कनिष्ठ ) सहाय्यक संचालक संवर्गाचे 1 पद व दोन लेखा अधिकारी (गट-ब) मंजूर आहेत.
विभागाचे ध्येय :-
- जिल्हा परिषदेचे सुयोग्य वित्तीय व्यवस्थापन करणे.
- जिल्हा परिषदेचे लेखे विहीत नमुन्यात ठेवणे.
- जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे तयार करून जिल्हा परिषदेची मान्यता घेवून शासनास सादर करणे.
- जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक तयार करणे.
- मुख्य कार्यकारी अधिकारी
- मुख्य लेखा व वित्त अधिकारी
- उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी
- लेखाधिकारी¸(1)
- विभागस्तर
- सहाय्यक लेखाधिकारी
- कनिष्ठ लेखाधिकारी
- वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
- लेखाधिकारी¸(2)
- पंचायतस्तर
- सहाय्यक लेखाधिकारी
- कनिष्ठ लेखाधिकारी
- वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
- जिल्हा परिषदेच्या लेख्याचे संकलन करणे.
- प्रारंभिक लेखे व देयकाची तपासणी करणे,अर्थ संकल्पीय अंदाज व बिलांची तपासणी व प्रदान करणे, तसेच जि.प.च्या विविध विभागाकडून मंजुरीसाठी येणारी देयके मंजुर करून प्रदान करणे.
- जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे ठेवणे तसेच भविष्य निर्वाह निधी व गटविमा रकमा प्रदान करणे.
- एनपीएस योजना लागु असणाऱ्या जिल्हा परिषदाकडील वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांना पीआरएएन नंबर देणेसाठीची कार्यवाही करणे तसेच दरमहा अंशदान कर्मचाऱ्यांच्या एनपीएस खात्यावर वर्ग करणेसाठी एनएसडीएल कडे पाठविणे.
- जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रदानावर नियंत्रण ठेवणे.
- जिल्हा परिषदच्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे तसेच तद अनुषंगीक सर्व अभिलेखे नोंदवहया अद्यावत ठेवणे.
- आर्थिक जमाखर्चाच्या लेख्याचे विवरणपत्र तयार करणे.
- जिल्हा परिषदेच्या आर्थिक बाबींवर सल्ला देणे व आर्थिक दायीत्वावर लक्ष ठेवणे.
- मासिक व वार्षिक हिशोब संकलन करणे.
- सर्व पंचायत समिती कार्यालयांचे अंतर्गत लेखापरिक्षण करून घेणे व त्याच बरोबर स्थानिक निधी लेखा परिक्षण व महालेखापाल यांचेकडील प्रलंबित परिच्छेद पुर्तता करणेकामी पाठपुरावा करणे व नियंत्रण ठेवणे.
- जिल्हा परिषद कार्यालयाचे मध्यवर्ती भांडार सांभाळणे.
- जिल्हा परिषद वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती पडताळणी काम करणे.
- निविदा तपासणी करणे.
- स्व:निधी व्याज ठेवी व अन्य गुंतवणुकी.
- स्वनिधी अंदाजपत्रक तयार करणे.
- जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचारी व प्राथमिक शिक्षक यांची सेवानिवृत्ती प्रकरणे मंजुर करणे.
विभागाची संरचना :-
विभागाची कार्यपध्दती :-
अर्थ विभागांतर्गत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे नियंत्रणाखाली कामकाज चालते. तसेच ते जिल्हा परिषदेचे आर्थिक बाबींचे सल्लागार असतात.या विभागामार्फत पुढीलप्रमाणे कामकाज चालते.
अर्थसंकल्प शाखा :- जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार करणे.शासनाकडून मंजुर झालेल्या अनुदानाचे कोषागारातून आहरण व संवितरण करणे, आरटीजीएस द्वारे वित्त प्रेषण वाटप करणे. सदर निधीचे नियोजन व खर्चावर नियंत्रण ठेवणे.
संकलन शाखा :- जिल्हा परिषदेस प्राप्त झालेल्या शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानातुन विभाग तालुका निहाय झालेला खर्च संकलित करून मासिक लेखे व वार्षिक लेखे तयार करून सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.
निवृत्ती वेतन शाखा :- जि.प.अंतर्गत वर्ग-3 व 4 कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणे मंजुर करणे. निवृत्ती वेतनाचे आदेश (पीपीओ) निर्गमित करणे ही कामे केली जातात. सदर शाखेचे संनियत्रण अधिकारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी हे आहेत.
पुर्व लेखा परिक्षण शाखा :- जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडील वित्तीय बाबीविषयक प्राप्त संचिकेवर अभिप्राय देवून मान्यतेस्तव सादर करणे.तसेच प्राप्त देयके पारित करून रक्कम संबंधिताचे खात्यावर आर.टी.जी.एस / झेडपीएफएमएस/एलपीआरएस द्वारे ऑनलाइन भरणा संबंधितांचे बँक खात्यावर जमा करणे ही कामे केली जातात.
वेतन पडताळणी शाखा :- जि.प.वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती पडताळणी करणेचे काम केले जाते.सदर शाखेचे नियंत्रण अधिकारी लेखाधिकारी-2 आहेत.
गटविमा योजना शाखा :- जि.प.वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे गटविमा योजनेची प्रकरणे मंजुर करणे. तसेच प्राप्त देयके तयार करून कोषागार कार्यालयात सादर करणे ही कामे केली जातात.
बाहय लेखा परिक्षण शाखा :-
जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती स्तरावरील स्थानिक निधी लेखा / पंचायत राज समिती / महालेखाकार नागपूर यांचे अहवालातील प्रलंबित परिच्छेदांचे निपटारा करणेसाठी अनुपालन पडताळणी शिबीराचे आयोजन करणे, तसेच जिल्हा परिषदेच्या विभागाचे व पंचायत समितींचे अंतर्गत लेखा परिक्षण व भांडार पडताळणी करणे व अहवाल निर्गमित करणे ही काम केली जातात.
आस्थापना शाखा :-
जि.प.अंतर्गत लेखा कर्मचाऱ्यांना नेमणुका, पदोन्नती, नियतकालीक / जिल्हा बदल्या, खातेनिहाय चौकशी प्रकरणे व इतर आस्थापना विषयक लाभ मंजुर करणे इत्यादी, तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी / उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी ,सहाय्यक लेखाधिकारी / कनिष्ठ लेखाधिकारी / वरिष्ठ सहाय्यक (लेखा) कनिष्ठ सहाय्यक (लेखा) इत्यादी संवर्गाची आस्थापना विषयक कामे करण्यात येतात.
भविष्य निर्वाह निधी शाखा :-
जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची प्राप्त प्रकरणे जसे भ.नि.नि. अंतीम प्रस्ताव,परतावा / नापरतावा व इतर अनुषंगीक प्रकरणे मंजुर करणे, कर्मचाऱ्यांचे स्लिप वाटप करणे तसेच भ.नि.नि. ची देयके कोषागार कार्यालयात सादर करून रक्कम संबंधिताच्या विभागप्रमुखांच्या खात्यावर जमा करणे. भ.नि.नि. वार्षिक खाते उतारा तयार करून संबंधितास कार्यालय प्रमुखामार्फत अदा करणे ही कामे केली जातात. सदर शाखेचे संनियत्रण अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे आहेत.
डीसीपीएस / एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना) :-
जि.प.अंतर्गत वर्ग-3 व वर्ग-4 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे डीसीपीएस / एनपीएस प्राप्त प्रकरणे जसे अंतीम प्रस्ताव, ना-परतावा, सानुग्रह अनुदान व इतर अनुषंगीक प्रकरणे मंजुर करणे. शिक्षकेत्तर कर्मचारी हे एनपीएस मध्ये असल्याने त्यांच्या स्लिप एनएसडीएल कार्यालयामार्फत ऑनलाइन पध्दतीने वाटप करणे ही कामे केली जातात. सदर शाखेचे संनियत्रण अधिकारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे आहेत.