बंद

    बांधकाम विभाग क्र.२

    विभाग परिचय

    बीड जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभाग क्र.२ हा विकास कामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाच्या अंतर्गत केंद्र शासन,राज्य शासन व जिल्हा परिषदे मार्फत देणेत येणाऱ्या अनुदानातून नवीन रस्ते तयार करणे रस्त्यांची देखभाल करणे ,इमारती अंतर्गत शाळा बांधकामे, शासकीय इमारती व निवासस्थाने इमारती बांधकामे, तालीम, इमारती समाज मंदिर सार्वजनिक वाचनालय बहुउद्देशीय सभागृह प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती व निवासस्थाने इत्यादी बांधकामाचा समावेश आहे.

    विभागाचे दृष्टी आणि ध्येय.

    अनियोजित रस्त्याबाबत वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने विचारात घेऊन जि .प अर्थसंकल्पीय तरतुदीस अधिन राहून ग्रामीण रस्ते व जि.प च्या मालकीच्या इमारती ची दुरुस्ती व रस्ते सुधारणाचा आराखडा तयार करण्यात येतो तरतूदशिर्ष
    निहाय उपलब्ध निधीनुसार आराखड्यातील कामांना जि.प.विषय समितीची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेकरिता अंदाज पत्रिके सादर करण्यात येतात.

    उदिष्टे आणि कार्य

      1. जिल्हा वार्षिक योजना लेखाशिर्ष -३०५४-२२२१ जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ग्रामीण भागास ईजिमा रस्त्यापासून ग्रामीण भागातील ग्रामीण मार्ग पोहोच रस्ता डांबरीकरण, खडीकरण, दुरुस्ती केली जाते तसेच पूल बांधकाम व दुरुस्ती केली जाते व जि.प अंतर्गत ईजिमा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्याची कामे केली जातात त्याचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला होतो.
      2. तीर्थ विकास कार्यक्रम लेखाशिर्ष ३६०४-०६४ अंतर्गत भक्त निवास बांधकाम शोचालय मंदिर पर्यंत पोहोच रस्ता सिमेंट कॉकरेट व फेवर ब्लॉक बसवणे व लहान नळकांडी पूल, हायमास बसवणे, सरक्षण भिंत बांधणे, पिण्याच्या पाण्याचा हौद बांधणे , नळ फिटिंग करणे,व भक्तांसाठी सुख सोयीसाठी उपक्रम राबवले जातात.
      3. लेखाशिर्ष ३०५४-२४१९ गट ब व क योजने अंतर्गत रस्त्याची डांबरी व खडीकरणाची दुरुस्ती केली जाते सदर योजनेची कामे शासन स्तरावर मंजूर होतात रस्ते दुरुस्ती केल्याने जनतेला दळण वळण सुलभ होते ,पूल दुरुस्ती व योजनेचे कामे या योजने अंतर्गत केली जातात सदर रस्ते इजीमा व ग्रामीण मार्ग रस्तेचे केली जातात.
      4. लेखाशिर्ष २५१५-१२३८ मा. लोक प्रतिनिधी ने सुचविलेल्या मुलभूत सुविधा ग्रामीण भागातील गावा अंतर्गत सदर योजनेचे कामे हि शासन स्तरावरून मंजुरी मिळते नंतर जिल्हा स्तरावरून पुढील कार्यवाही केली जाते या योजने अंतर्गत गावा अंतर्गत सिमेंट रस्ते/ नाली बांधकाम मुलभूत सुविधेचे कामे केली जातात याचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला होतो.
      5. आरोग्य विभागाची कामे –आरोग्य विभगामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र/ बांधकाम दुरुस्ती नियोजन करून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येते. व मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग पूर्ण पणे पार पाडते.
      6. शिक्षण विभाग- शिक्षण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळा इमारत बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येते व मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग पूर्ण पणे पार पाडते.
      7. पशु संवर्धन- खात्यामार्फत मंजूर करण्यात आलेले पशु वैद्यकीय दवाखाने प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येते. व मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग पूर्ण पणे पार पाडते.
      8. मा.आमदार महोदय व मा. खासदार महोदय यांनी शिफारस केलेली कामे जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कडून प्रशासकीय मान्यता प्रदान केली जाते व मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग पूर्ण पणे पार पाडते.
      9. डोंगर विकास कार्यक्रम – मा.आमदार महोदय यांनी शिफारस केलेली कामे जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कडून प्रशासकीय मान्यता प्रदान केली जाते व मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग पूर्ण पणे पार पाडते.
      10. बाळासाहेब ठाकरे मातोश्री स्मृती ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम – सदरील कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव ग्रामपंचायत कडून उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्याकडे सादर केले जातात व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्यामार्फत काम पूर्ण करण्यात येते.
      11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना- सदस्य महोदय च्या शिफारशी नुसार कामे मंजूर सदरील कामांना प्रशाकीय मान्यता समाजकल्याण विभगामार्फत प्रदान केली जाते व मंजूर काम पूर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभाग पूर्ण पणे पार पाडते.