राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना

महाराष्ट्र शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेवरील आर्थिकदृष्टया दुर्बल/बेघर/अल्पभूधारक गरजूसाठी घरे बांधण्यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा क्र.१ व २ योजना सुरु केलेली आहे.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.१ ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी आहे. ही योजना इंदिरा आवास योजनेच्या धर्तीप्रमाणेच राबविली जाते.

या योजनेचे निकष इंदिरा आवास योजनेच्या निकषाप्रमाणेच असून सदर योजनेच्या निधीचा पुरवठा राज्य शासनाकडून केला जातो.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना क्र.२ ही दारिद्रय रेषेवरील परंतु वार्षिक उत्पन्न रु.५००००/- पेक्षा कमी असलेल्या कुटुंबाकरीता असून, प्रत्येक लाभार्थी कुटुंबास रु.४५०००/- बिनव्याजी कर्ज मिळेल.

दिनांक २७ ऑगस्ट ०९ च्या शासन निर्णयानुसार योजना क्र.२ योजना सुधारीत करण्यात आली असून ही दारिद्रय रेषेवरील परंतु वार्षिक उत्पन्न रु.९६०००/- पेक्षा कमी असलेल्या कुटुंबाकरीता असून, प्रत्येक लाभार्थी कुटुंबास रु.९००००/-बिनव्याजी कर्ज व लाभार्थी स्वहिस्सा रु.१००००/- असे मिळून रु.१०००००/- किमतीचे घरकुल लाभार्थीस शासनामार्फत देणेत येते.

सदरचे रु. ९००००/- बिनव्याजी कर्ज लाभार्थीने रु ८३३ महीना प्रमाणे १० वर्षात परतफेड करावयाचे आहे. पहिले वर्ष अस्थगन कालावधी पकडण्यात येईल.

घरकुल बांधणेसाठी लाभार्थीचे स्वतःच्या मालकीचे अथवा शासकीय/ग्रामपंचायत मालकीचे ७५० चौ.फुट भूखंड क्षेत्रफळ आवश्यक त्यापैकी २६९ चौ.फुट बांधकाम क्षेत्रफळ करणे आवश्यक आहे.

राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचे नाव गृहनिर्माण विभागाकडील शासन निर्णय दिनांक २२ ऑगस्ट २०१४ अन्वये बदलून ते राजीव गांधी घरकुल योजना असे नामकरण करण्यात आले आहे.