संकलन शाखा

जिल्हा परिषदेतंर्गत वित्त विभागातील ही शाखा अत्यंत महत्वाची असुन याद्वारे जि.प.ची जमा व खर्चाचे हिशेब महा.जि.प.व प.स.लेखासंहिता 1968 नुसार ठेवले जातात. सदर जमा व खर्चाचे लेखे संगणीकृत असुन मासीक तसेच वार्षिक लेखे संगणीकृत असुन सदर संगणीकृत लेखे शासनास सादर केले जातात. तसेच विविध विभागांकडुन प्राप्त मासीक व त्रैमासीक लेखे तपासुन शासनास सादर केली जातात. शासनाकडुन प्राप्त अनुदान कोषागारातुन काढणे, अधिकोषात जमा करणे, महालेंखाकार , नागपुर यांचेशी त्रैमासीक ताळमेळ करणे, विभागाकडे प्राप्त चलन स्विकारणे, विनियोजन लेखे ठेवणे.